Baaghi 4: 'हर आशिक एक विलेन है'; टायगर श्रॉफ आणि संजय दत्त येणार आमने-सामने, टिझर बघून चाहत्यांचा आली 'अ‍ॅनिमल' ची आठवण

Baaghi 4: टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांच्या 'बागी ४' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टिझर पाहून लोकांना 'अ‍ॅनिमल' ची आठवण येत असून या टिझरला 'अ‍ॅनिमल' ची कॉपी बोलत आहेत.
Baaghi 4
Baaghi 4Saam Tv
Published On

Baaghi 4 Teaser: टायगर श्रॉफ, संजय दत्त आणि सोनम बाजवा यांच्या 'बागी ४' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज संधू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे हर्षाने दिग्दर्शन केले आहे आणि साजिद नाडियाडवाला निर्माते आहेत. टीझरमध्ये इतकी हिंसाचार आहे की युट्यूबवर देखील टिझर डायरेक्ट दाखवला जात नाही. १ मिनिट ४९ सेकंदाच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. इतकी हिंसाचार पाहून काही जण त्याला 'अ‍ॅनिमल'ची कॉपी म्हणत आहेत.

१ मिनिट ४९ सेकंदाच्या व्हिडिओमधील हिंसा

'बागी ४' चा टीझर टायगर श्रॉफच्या संवादाने सुरू होतो की ' हमारी जरूरत और जरूरी में फर्क होता है. अलिशा, तेरी जरूरत थी और मेरी लिये जरूरी.' या संवादादरम्यान संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू रडताना दाखवले जातात. पण यानंतर खरा खेळ सुरू होतो. संपूर्ण टिझर संजय दत्त आणि टायगर पूर्णपणे 'अॅक्शन' मोडमध्ये दिसत आहे.

Baaghi 4
kiara advani: 'मी तुझं डायपर बदलते, तू माझं...'; कियारा अडवाणीने लाडक्या लेकीसाठी शेअर केली क्यूट पोस्ट

टायगर श्रॉफ आणि संजय दत्तचे कौतुक

टायगर श्रॉफचा दुसरा संवाद आहे, 'लहानपणी मी माझ्या आईकडून एका नायक आणि खलनायकाच्या कथा ऐकायचो, तेव्हा मला माहित नव्हते की मी माझ्या कथेचा नायक आणि खलनायक मीच होईन.' टीझरमध्ये हरनाज संधूपासून सोनम बाजवा यांचे देखील अनेक हिंसक दृश्ये आहेत. संजय दत्तच्या स्वॅगचे देखील खूप कौतुक होत आहे आणि टायगरच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

Baaghi 4
Metro In Dino Ott Release: पंकज त्रिपाठींचा मेट्रो इन दिनो लवकरच होणार या ओटीटीवर प्रदर्शित; थिएटरनंतर आता ओटीटीही गाजवणार

'बागी ४' चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकाने म्हटले, 'अ‍ॅनिमल २?' दुसऱ्याने कमेंट केली, 'अ‍ॅनिमलचा हा स्वस्त रिमेक आहे का हा?' आणखी एकाने लिहीले, 'अ‍ॅनिमलची कॉपी का केली स्वत:चं डोकं वापरा ना, तर आणखी एकाने लिहीले, हा टिझर आहे की कत्तलखाना.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com