kiara advani Post: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना १५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये गोड अशी मुलगी झाली. त्यांच्या आयुष्यातील हा अद्भुत आणि आनंददायी क्षण त्यांनी सोशल मिडियावर एक गुलाबी पोस्टरच्या माध्यमातून जाहीर केला, ज्यावर लिहिले होते, "आमचे मन भरून आले आहे आणि आमचे जग कायमचे बदलले आहे. आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे."
अलीकडेच, कियारा अडवाणीने तिच्या मुलीसोबत अनुभवलेल्या क्षणांचे एक अतिशय हृदयस्पर्शी आणि भावनिक पोस्ट द्वारे वर्णन केलं आहे. तिने रात्री उशिरा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "मी तुझं डायपर बदलते, तू माझं जग बदल" या साध्या पण भावपूर्ण ओळींनी नवीन मातृत्वाच्या प्रेम, थकवा आणि गोड क्षणांचं मिश्रण मांडलं आहे. ही इंस्टा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
याशिवाय, कियाराचा ३१ जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला आई म्हणून तिचा पहिला वाढदिवस होता. या खास दिवशी तिने "Wonderful Mama" असं लिहिलेला केक शेअर केला आणि लिहिले,"माझा सर्वात खास वाढदिवस माझ्या आयुष्यातील प्रेमाने भरलेला... माझे बाळ, माझा नवरा आणि माझे आई-वडील... अविश्वसनीय कृतज्ञ धन्य."