Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : "७ लाख देतो 'कॉम्प्रोमाइज' कर", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

Lavina Tandon On Casting Couch: 'जोधा अकबर' फेम अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिला 'कॉम्प्रोमाइज' करण्यासाठी 7 लाखांची ऑफर देण्यात आली होती.

Shreya Maskar

'जोधा अकबर' फेम अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा किस्सा सांगितला

अभिनेत्रीला तब्बल 7 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती

प्रसिद्ध अभिनेत्रीला दोन वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला

कास्टिंग काउच मनोरंजन विश्वाची काळी बाजू आहे. आजच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना कधीकाळी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. 'जोधा अकबर' ही हिंदी मालिका खूप गाजली, या मालिकेमुळे अनेक कलाकारांना ओळख मिळाली. अशात आता 'जोधा अकबर' फेम प्रसिद्ध अभिनेत्री लविना टंडन (Lavina Tandon) धक्कादायक खुलासा केला आहे. तिला तब्बल दोन वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. अभिनेत्रीला चक्क कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ७ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ७ लाख रुपयांची ऑफर

लविना टंडनने 'जोश टॉक' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "इंडस्ट्री बाहेरून ग्लॅमरस दिसते, पण कास्टिंग काउचमुळे ती बदनाम आहे. लोकांना भूमिका मिळतात आणि मग ते त्या बदल्यात काहीतरी करतात. इतक्या वर्षांत माझ्यासोबत दोनदा असे घडले, जिथे मला अगदी थेटपणे विचारण्यात आले, 'तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल का?' साउथच्या एका कास्टिंग एक्झिक्युटिव्हचा मला फोन आला. त्याने सांगितले की, शूटिंगला साधारण १५-२० दिवस लागतील. बजेट सुमारे ५ लाख होते आणि जर मी कॉम्प्रोमाइज केले, तर मला ७ लाख मिळतील. मी त्याला अगदी स्पष्टपणे उत्तर दिले, 'माझ्याशी संपर्क साधल्याबद्दल आणि तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल धन्यवाद, पण मी हे करत नाही...जर तुम्हाला अशा ऑफर्स आल्या, तर पुन्हा मला फोन करू नका. जर दुसरे काही काम आले, तर कृपया संपर्क करा..."

लविना टंडनने आणखी एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, "हे अलिकडेच माझ्यासोबत घडले आहे... मला अगदी सहजपणे सांगण्यात आले की, लोक असं करतात आणि तू सुद्धा करू शकतेस. त्यावर मी म्हणाली की, 'जर मलापण असे करायचे असते, तर मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितले असते. 'ठीक आहे, हो, मी करेन.' पण माझ्या करिअरच्या या टप्प्यावर मी हे का करू? मी सहसा असे करत नाही. त्यामुळे, अशा काही गोष्टी आहेत, पण कोणीही तुम्हाला ते करण्यास भाग पाडणार नाही. नाही म्हणजे नाही."

लविना टंडनचे करिअर

लविना टंडनला 'जोधा अकबर' मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. यात तिने रुकैया बेगमची भूमिका साकारली होती. 'एक हजारो में मेरी बहना है', 'बालवीर', 'दिल मिल गये' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या लविना टंडन 'अनदेखी'च्या चौथ्या सीझनचा भाग असून, ती राशी डांगवाल नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT