Bollywood Celebrities At Jio World Plaza Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jio World Plaza: सलमान खान-रणवीर सिंगपासून ते रश्मिका मंदानापर्यंत, 'जिओ वर्ल्ड प्लाझा'च्या उद्घाटनाला बॉलिवूड सिलिब्रिटींनी लावले चार चाँद

Jio World Plaza Launch Event: मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा मॉल मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसीमध्ये (BKC) आहे.

Priya More

Bollywood Celebrities At Jio World Plaza:

देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल 'जिओ वर्ल्ड प्लाझा'चा (Jio World Plaza) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा मॉल मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसीमध्ये (BKC) आहे. हा मॉल फक्त लक्झरी नाही तर याठिकाणी मिळणाऱ्या वस्ती देखील खूपच लक्झरी असणार आहेत. हा मॉल सध्या चांगलाच चर्चेत आहे.

१ नोव्हेंबर म्हणजे आजपासून हा मॉल सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrities) हजेरी लावली. यावेळी बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमध्ये जलवा दाखवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'जिओ वर्ल्ड प्लाझा' हा मॉल सध्या सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या मॉलचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमात संपूर्ण अंबानी कुटुंब दिसले. अंबानी कुटुंबीयांच्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंबानी कुटुंबीयांच्या सूना श्लोका आणि राधिका या खूपच खास अंदाजमध्ये दिसल्या. या कार्यक्रमात अंबानी कुटुंबासोबतच बॉलीवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. काही सेलिब्रिटींनी तर या कार्यक्रमादरम्यान स्टायलिश अंदाजमध्ये रेड कार्पेटवर रॅम्प वॉक केला. या कार्यक्रमात दीपिका आणि रणवीरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने शानदार एन्ट्री केली. त्याचवेळी सलमान खान रेड कार्पेटवर वैभव मर्चंटसह काही लोकांना मिठी मारताना दिसला. दीपिका पदुकोण, मौनी रॉय, काजल अग्रवाल, शहाज गिल, मलायका अरोरा या अभिनेत्री वेस्टर्न लूकमध्ये दिसल्या. त्यांच्या जबरदस्त लूकमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. या इव्हेंटमध्ये रणवीर सिंगच्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रितेश देशमुखने पत्नी जेनेलियासोबत, माधुरी दीक्षितने पती श्रीराम यांच्यासोबत हजेरी लावली.

शहनाज गिलही लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय रश्मिका मंदान्नाने या कार्यक्रमासाठी गोल्डन आणि व्हाइट शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. अथिया शेट्टी वडील सुनील शेट्टीसोबत क्रॉप टॉप आणि प्रिंटेड कोट पँटमध्ये पोज देताना दिसली. याशिवाय जॉन अब्राहम, तमन्ना भाटिया, भूमी पेडणेकर, करीना कपूर खान, करण जोहर, नोरा फतेही आणि राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांच्यासह अनेक स्टार्सनी आपल्या लूकने चाहत्यांना वेड लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT