Virat Kohli Hairstyle: आहा कडक! IPLसाठी कोहलीची झक्कास हेअर स्टाइल,बॉलीवूड स्टार्सला ही सोडलंय मागे -PHOTO

Virat Kohli New Look : त्याच्या नव्या लुकचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Virat Kohli
Virat KohliTwitter

Virat Kohli New Haircut: आयपीएल २०२३ स्पर्धेला येत्या ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली. सर्व खेळाडू नेट्समध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली एका नव्या लूकमध्ये दिसून आला आहे. त्याच्या नव्या लुकचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

Virat Kohli
Suryakumar Yadav: 'हे चुकीचं आहे,सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसन सोबत करूच नका..' माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

विराट कोहली आगामी हंगामात नव्या लूकमध्ये दिसून येणार आहे. आरसीबीच्या ताफ्यात प्रवेश करण्यापूर्वी त्याने नवीन हेअरकट केला आहे. तो आता नव्या लुकसह मैदानात उतरणार आहे. त्याच्या या नव्या लुकचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Latest sports updates)

तसेच तुम्ही पाहू शकता की, या फोटोमध्ये आलीम हकीम देखील दिसून येत आहे.

आलीम हकीम हा प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आहे. त्याने अनेक सेलिब्रिटींचे हेअरकट केले आहेत. विराटने यापूर्वी देखील आलीम हकीम कडून हेअर कट केला आहे. तसेच विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तो जोरदार फॉर्ममध्ये आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेतही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. आगामी आयपीएल हंगामातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Virat Kohli
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी असा आहे आरसीबीचा संघ..

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com