Shiv Thakare Bought New Home Instagram @shivthakare9
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare Buy New Home: शिव ठाकरेचे न्यू इयर दणक्यात; मायनगरीमध्ये खरेदी केलं ड्रीम होम

Shiv Thakare News: अमरावतीच्या शिवने मुंबईत स्वत:चे नवीन घर घेतले आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare Bought New Home

मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने फक्त मराठी सिनेसृष्टीतच हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतही आपले नाव कमावले आहे. बिग बॉस मराठी २, बिग बॉस १६ नंतर नुकताच 'झलक दिखला जा ११' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कायमच आपल्या कलागुणांमुळे चर्चेत राहणारा शिव सध्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. नवीन वर्षाचे औचित्य साधत अभिनेत्याने 'झलक दिखला जा ११' या शोमध्ये त्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली. अमरावतीच्या शिवने मुंबईत स्वत:चे नवीन घर घेतल्याची माहिती दिली आहे. (Bollywood)

त्याने नवीन घर घेतल्याची माहिती दिल्यानंतर फराह खानने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'साजिदने कालच मला सांगितलं की तू नवं घर खरेदी केलं आहेस.' असं स्वत: फराह म्हणाली. शिवने नवं घर खरेदी केल्यामुळे फराहने त्याला सुंदर गणपती बाप्पाची मुर्तीही भेट म्हणून दिली आहे.

सोबतच तिने नव्या घराच्या चावीचीही तिने पुजा केली. त्यासोबतच शिवने नवीन कारही खरेदी केली आहे. तब्बल ३० लाख रुपयांचीही नवीन कार आहे. या बद्दलची माहिती त्याने 'झलक दिखला जा ११' या शोमध्येच दिली आहे. (Bollywood News)

शोमध्ये, गौहर खान आणि ऋत्विक धनजानीने शिवला २०२३ वर्षाबद्दल विचारले त्यावेळी तो म्हणाला, “ २०२३ वर्ष माझ्यासाठी खरंच खूप खास होतं. गेल्या वर्षामध्ये माझ्या संपूर्ण आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळाली आहे. २०२३ या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल झालेय. मला वाटायचं की, मी सेकंड हँड कार घेईन, पण २०२३ या वर्षामध्ये मी ३० लाख रुपयांची नवी कोरी अलिशान कार घेतली.” (Tv Serial)

पुढे शिव ठाकरे म्हणाला, “अनेक जणं म्हणतात की, मुंबई सारख्या ड्रीम सिटीमध्ये घर घेण्यासाठी आपल्याला आयुष्यभर झगडावं लागतं. मी ही गुड न्यूज सर्वांना 'झलक दिखला जा ११' या शोच्या माध्यमातून सर्वांना माझ्या घराची गुड न्यूज चाहत्यांना देतो. मी गेल्या ८ दिवसांपूर्वीच नवं घर बुक केलं आहे.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT