Indiara Bhaduri News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indiara Bhaduri: जया बच्चन यांच्या आईच्या निधनाचं वृत्त खोटं, कुटुंबीयांनी सांगितलं सत्य

Jaya Bachchan Mother News: खासदार जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

Bharat Jadhav

जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचं निधन झाल्याचं वृत्त होतं. मात्र हे वृत्त खोटं असल्याची माहिती बच्चन कुटुंबियांकडून देण्यात आलीय. त्या ९४ वर्षाच्या आहेत. मागील काही दिवसांपासून इंदिरा भादुरी या आजारी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोशल मीडियावर नेहमीच अफवांचं पेव फुटत असतं. अशाच प्रकारची अफवा आज सोशल मीडियात पसरली. जया बच्चन यांच्या आई आणि अमिताभ यांच्या सासू इंदिरा भादुरी यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियात आलं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येही यासंबंधी दावा करण्यात आला. पण हे वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं. बच्चन कुटुंबीयांनीच हे वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केले.

अभिषेक बच्चनकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून, इंदिरा भादुरी या ठणठणीत आहेत, असे सांगण्यात आले आहे.

इंदिरा भादुरी या अनेक दिवसांपासून आजारी असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियात देण्यात आले. पण हे वृत्त त्यांच्या केअरटेकरने फेटाळले आहे. इंदिरा भादुरी यांची प्रकृती ठीक आहे. पाठिच्या दुखापतीने त्या त्रस्त असून, रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुपारी लंच देखील केले, असे केअरटेकरने माध्यमांना सांगितले.

त्यांचे पती तरुण भादुरी हे पत्रकार आणि लेखक होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांत काम केलं होतं. तरुण यांचा मृत्यू १९९६ मध्ये झाला होता. दरम्यान मागील वर्षी डिसेंबरमध्ये जया बच्चन यांच्या आई इंदिरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंदिरा यांच्या निधनाचे वृत्त फेटाळतानाच, अशा कोणत्याच बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी विश्वसनीय व्यक्तींकडून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. इंदिरा यांची देखभाल करणाऱ्या केअरटेकरनेही इंदिरा यांच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे. इंदिरा भादुरी यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT