Shah Rukh Khan Jawan Karni Sena Filed An FIR Instagram @redchilliesent
मनोरंजन बातम्या

Jawan Dialogue Controversy: प्रदर्शनाआधीच ‘जवान’ अडचणीत, ‘या’ डायलॉगमुळे करणी सेना आक्रमक, दिला इशारा...

Karni Sena Filed An FIR Agianst Shah Rukh Khan's Jawan Movie : चित्रपट प्रदर्शनाला अवघे दोन दिवसच शिल्लक राहिले असताना करणी सेनेनं शाहरूखच्या ‘जवान’मधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे.

Chetan Bodke

Jawan Controversy Over The Dialogue Of Shah Rukh Khan

शाहरूख खान आणि नयनतारा अभिनित ‘जवान’ची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या काही बदलांमुळे बराच चर्चेत आला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले असून निर्मात्यांना एकूण चित्रपटामध्ये ७ महत्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली होती. अशातच चित्रपट प्रदर्शनाला अवघे दोन दिवसच शिल्लक राहिले असून चित्रपटासमोर एक वाद येऊन उभा ठाकला आहे. करणी सेनेनं शाहरूखच्या ‘जवान’मधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे.

शाहरूखसमोर वाद काही नवीन नाही. त्याचे अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकून प्रदर्शित झालेले आहेत. शाहरूख आणि दिपीकाच्या ‘पठान’ चित्रपटातील भगव्या बिकनीवरून मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. चित्रपटाला सोशल मीडियासह सर्वत्रच प्रचंड प्रमाणात विरोध मिळत होता. त्यामुळे शाहरूखसह दिपीका, चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक खूपच चिंतेत होते. पण जरीही असं असलं तरी चित्रपटाने कोट्यवधींचा टप्पा गाठला होता.

नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेने शाहरूखच्या ‘जवान’ विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. अवघ्या काही तासातच ट्रेलरने लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. पण जरीही एवढं असलं तरी, चित्रपट एका कारणामुळे बराच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. करणी सेनेने शाहरूखच्या ‘जवान’मधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाहरूख आणि नयनतारा प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून क्रेझ आहे.

एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था... या डायलॉगवर करणी सेनेने आक्षेप घेतलाय. करणी सेनेने त्या डायलॉग विरोधात पोलिस स्थानकातही धाव घेतली आहे. चित्रपटातला हा संवाद महाराणा प्रताप यांच्याशी संबंधित असून त्या डायलॉगमुळे करणी सेनेतील व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले. करणी सेनेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या संवादावरून आम्ही ओशिवरा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तो डायलॉग जर निर्मात्यांनी प्रदर्शनाआधीच जर काढला नाही तर, त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा करणी सेनेकडून देण्यात आला आहे.

एकंदरीतच, चित्रपटाच्या तिकीट विक्रीबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे तब्बल २.७१ लाख तिकिटांची विक्री झाली. म्हणजेच, चित्रपटाने प्रदर्शनाआधी एकूण ८.९८ कोटींची कमाई केलीय. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी झळकणार आहेत.

चित्रपटातील गाण्यांना धमाकेदार प्रतिसाद मिळाल्यानंतर, सध्या ट्रेलरची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Champions trophy 2025 रद्द होणार? BCCI चा पाकिस्तानात जाण्यास नकार; PCB समोर कोणते पर्याय शिल्लक?

Sharad Pawar : सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले, VIDEO

Maharashtra News Live Updates : काय झाडी, काय डोंगर, गुहावटीला मोजत बसा; उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंना टोला

Sushma Andhare : अमित शाह यांच्याकडून सल्ला घ्यावा इतके वाईट दिवस 'मातोश्री'चे आले नाहीत, ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्याची तोफ धडाडली

Dahisar News : मुंबईत भाजप-ठाकरे गट आमनेसामने; दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये कुटाकुटी! पाहा Video

SCROLL FOR NEXT