Rashmika Mandanna At Wedding: रश्मिका असिस्टंटच्या लग्नात पोहोचली, तिथे घडलं असं काही की मंडपात हातच जोडले

Rashmika Mandanna's Viral Video: अभिनेत्रीने तिच्या जवळच्या खास व्यक्तीच्या लग्नाला हजेरी लावली आहे.
Rashmika Mandanna At Her Assistant Wedding
Rashmika Mandanna At Her Assistant WeddingSaam TV
Published On

Rashmika Mandanna Attended Her Assistant's Wedding:

अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लागणीच्या अफवा वरचेवर आपल्या कानी येत असतात. तिच्या लग्नाच्या चर्चा होत असताना अभिनेत्रीने तिच्या जवळच्या खास व्यक्तीच्या लग्नाला हजेरी लावली आहे.

रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रश्मिकाने या व्हिडीओमध्ये एका लग्नाला गेल्याचे दिसत आहे. चला जाणून घेउया हे च्यारलं व्हिडीओमधील वधू-वराविषयी.

Rashmika Mandanna At Her Assistant Wedding
Aai Kuthe Kay Karte Update: केळकरांच्या घरी जाताच ईशाला झाला श्रीमंतीचा गर्व; अरुंधती कसं करेल लेकीचं गर्वहरण

रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ती कुठल्याही लूकमध्ये अप्रतिम दिसते. या व्हायरल व्हिडीओमध्ये देखील रश्मिका खूप छान दिसत आहे. रश्मिकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. डोळ्याला टिकली लावली आहे आणि खूपच बेसिक मेकअप केला आहे.

रश्मिका मंदाना तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला गेली आहे. रश्मिका मंदानाच्या असिस्टंटच लग्न होत. रश्मिका त्यांच्या लग्नाला उपस्थित राहिल्याने त्यांना खूप आनंद झाला. रश्मिकाने त्यांच्यावर अक्षता टाकताच दोघांनी तिला वाकून नमस्कार केला. रश्मिकाने देखील त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्यासोबत फोटो काढला.

रश्मिका मंदाना तिच्या असिस्टंटच्या लग्नाला उपस्थित राहिली. तिचा त्या लग्नातील सहज वावर. कुठेही स्टार असल्याचा अविर्भाव न दाखवता रश्मिका मंडपात उभी होती. यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे. (Latest Entertainment News)

Rashmika Mandanna At Her Assistant Wedding
Cham Cham Paus Marathi Song: आर्टिफिशियल पावसात शूट झालेलं 'छम छम पाऊस' गाणं चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com