Cham Cham Paus Marathi Song: आर्टिफिशियल पावसात शूट झालेलं 'छम छम पाऊस' गाणं चर्चेत

Cham Cham Paus Marathi Song: अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचं नवं गाणं नुकतेच प्रदर्शित झालं आहे. '
Cham Cham Paus Marathi Song:
Cham Cham Paus Marathi Song: Saam tv
Published On

cham cham paus New Marathi Song:

अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचं नवं गाणं नुकतेच प्रदर्शित झालं आहे. 'छम छम पाऊस' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर आहेत. तर गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. आर्टिफिशियल पावसात 'छम छम पाऊस' या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

या नव्या गाण्याविषयी अभिनेता हरिश वांगीकर म्हणाला की, 'मी एकदा पाऊस बघत बघत गाणी ऐकत होतो. तेवढ्यात माझ्या प्लेलिस्टमध्ये एक गरब्याचं गाणं सुरू झालं. मला हे गाणं सुचलं. 'छम छम पाऊस' हे पावसावरील रोमँटिक गाणं आहे. या गाण्याचं संगीत गरबा फॉर्ममध्ये आहे. तर या गाण्याचे बोल मराठी आहेत'.

Cham Cham Paus Marathi Song:
Gashmeer Mahajani New Role: “पुन्हा तोच प्रवास सुरू होतोय…”, गश्मीर पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत; व्हिडीओ शेअर करत दिली चाहत्यांना मोठी हिंट

'माझा मित्र अविनाश पायाळ याने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अविनाश आणि अंकितासोबत रिअर्सल करताना खूप धमाल आली. चित्रीकरण करताना पावसात भिजून भिजून फार थंडी वाजत होती. या गाण्याला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळत आहे. ते पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार, असे तो पुढे म्हणाला.

अभिनेत्री अंकिता राऊत म्हणाली,' या गाण्याचं चित्रिकरण पहाटेचं होतं. त्यावेळी पाऊस आला होता. त्यानंतर पाऊसच पडला नाही. त्यामुळे आम्ही आर्टिफिशियल पावसात संपूर्ण गाण्याचं चित्रिकरण केलं. आर्टिफिशियल पाऊस पडताना दाखवणं सोप्पं नाही'.

Cham Cham Paus Marathi Song:
Adil Durrani Defamation Case: राखी सावंतच्या विभक्त नवऱ्याने तिच्याकडे मागितले २०० कोटी रुपये, नेमकं काय आहे प्रकरण...

'चित्रीकरणादरम्यान, माझ्या नाकातोंडात पाणी गेलं. त्यामुळे भयानक थंडी वाजत होती. त्यामुळे थोडा ब्रेक घ्यावा लागला होता. चित्रिकरणावेळी अचानक लाईट सुद्धा गेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चित्रिकरण करण्यात आलं. गाण्याचं चित्रिकरण करताना खूप मजा आली, अंकिता पुढे म्हणाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com