Hardik Joshi Comeback Tuzech Mi Geet Gaat Aahe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tuzech Mi Geet Gaat Aahe Serial: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेमध्ये येणार नवा ट्वीस्ट; 'सनी म्हणजे कोण ?' होणार उलगडा

Tuzech Mi Geet Gaat Aahe Latest Update: 'तुझेच मी गीत गात आहे.' ही मालिका मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या पसंदीस पडत आहे. कायमच टीआरपी यादीमध्ये टॉप १०मध्ये अव्वल राहणाऱ्या ह्या मालिकेमध्ये प्रेक्षकांना नवा ट्वीस्ट मिळणार आहे.

Chetan Bodke

Hardik Joshi Comeback Tuzech Mi Geet Gaat Aahe

स्टार प्रवाहावरील अनेक मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपी यादीमध्ये अव्वल आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजेच 'तुझेच मी गीत गात आहे.' या मालिकेतल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

मालिकेचे कथानक आणि कथेमध्ये येणारे नवनवे ट्वीस्ट प्रेक्षकांना फारच भावले असून ही मालिका कायमच टीआरपी यादीमध्ये टॉप १०मध्ये अव्वल राहिली आहे. पुन्हा एकदा मालिकेला नवा ट्रॅक मिळाला असून मालिकेमध्ये एका नव्या चेहऱ्याला संधी मिळाली आहे. नुकतंच निर्मात्यांकडून एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांना मालिकेबद्दल खूपच उत्सुकता लागली आहे. (Tv Serial)

सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलं आहे. वैदेहीच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे ? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. लवकरच प्रेक्षकांना वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य उघडकीस येणार आहे. तर, सनी नावाच्या व्यक्तीने मोनिकासाठी लिहिलेले प्रेमपत्रही लवकरच मल्हारच्या हाती लागणार आहे. त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात दुरावा येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Star Pravah)

नुकतंच निर्मात्यांनी मालिकेचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, मालिकेतील सर्वच कलाकार मंडळी 'कोण असेल तो' असं बोलताना दिसत आहे. पण त्यांनी त्या प्रोमोमध्ये नेमका तो कोण आहे कलाकार आहे ?, या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. पण अनेक मीडिया रिपोर्टनुसार मालिकेमध्ये शुभंकरच्या भूमिकेत हार्दिक जोशी दिसण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच्या एपिसोडमध्ये हार्दिक या मालिकेमध्ये दिसला होता. सध्याचे कथानक पाहता मल्हार-मोनिकाचं नातं निर्णायक वळणावर आहे. लवकरच मालिकेमध्ये शुभंकर येणार आहे. (Social Media)

मालिकेमध्ये मोनिकासाठी पत्र लिहिणारा सनी म्हणजे शुभंकर असून आता लवकरच शुभंकर या सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे. त्यामुळे शुभंकरमुळे मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ येणार, हे नक्की. या वादळात ती स्वत: कशाप्रकारे सामना करते, हे आपल्याला येत्या काही दिवसांतच कळेल. सध्या 'तुझेच मी गीत गात आहे.' ही मालिका स्टार प्रवाहावर रात्री ९ वाजता प्रसारित होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

Chanakya Niti : आयुष्यात एकदातरी प्रेमात पडलेल्यांनी नक्की वाचा 'या' सिक्रेट टिप्स

Maharashtra Live News Update : उपसभापती हरिवंश सिंह यांनी भूषवलं राज्यसभेचं सभापतिपद

Beed : मुलीचे अपहरण; वीस दिवसांपासून तपास लागेना, पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचे नातेवाईकांचा आरोप

SCROLL FOR NEXT