Ajinkya Nanaware Wedding: अन् अजिंक्यने लग्नामध्येच सासू-सासऱ्यांचे आभार मानले, म्हणाला - 'तुम्ही तुमची सोन्यासारखी मुलगी...'

Ajinkya Nanaware And Shivani Surve: ठाण्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे लग्न पार पडले. दोघांच्याही जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे (Ajinkya Nanaware Wedding) फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ajinkya Nanaware Wedding
Ajinkya Nanaware WeddingSaam Tv
Published On

Shivani Surve And Ajinkya Nanaware Wedding:

मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) हे कपल नुकताच विवाहबंधनात अडकले. शाहीथाटामध्ये या कपलचा विवाहसोहळा पार पडला. ३१ जानेवारीला साखरपुडा आणि १ फेब्रुवारीला त्यांनी लग्न केले. ठाण्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे लग्न पार पडले. दोघांच्याही जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे (Ajinkya Nanaware Wedding) फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच शिवानीचा पती म्हणजेच अजिंक्य ननावरे लग्नातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नामध्ये दोन्ही कपल खूपच सुंदर दिसत होते. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अजिंक्यने लग्नामध्ये आपल्या सासू-सासऱ्यांचे आभार मानले आहे. अजिंक्य या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे की, 'शिवानी माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. ती जशी आहे तशी मला खूप गरजेची आहे आणि आता ती मला आयुष्यभर हवीये. थँक्यू थँक्यू… तुम्ही मला तुमची एवढी सोन्यासारखी मुलगी देत आहात.'

अंजिक्य आणि शिवानीच्या लग्नातीस खास क्षण, अजिंक्यची घोड्यावरून एन्ट्री, एकमेकांना वरमाला घालताना, हळदीचे व्हिडीओ आणि फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. दोन्ही कपलवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवानी आणि अजिंक्याच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण अचानक त्यांनी लग्न केल्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला. या रिल लाइफ कपलने रिअल लाइफमध्ये एकमेकांना आपले जोडीदार म्हणून निवडले आहे.

लग्नामध्ये शिवानी आणि अजिंक्य खूपच क्यूट दिसत होते. त्यांचा हटके लूक सर्वांना प्रचंड आवडला. शिवानी आणि अजिंक्यने लग्नामध्ये एकसारखीच ड्रेसिंग केली होती. शिवानीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातलेली शिवानी नववधूच्या रुपामध्ये खूपच आकर्षक दिसत होती. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा शेरवानी सूट आणि फेटा बांधला होता. तो देखील या लूकमध्ये हँडसम दिसत होता.

अजिंक्य आणि शिवालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अजिंक्य 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. सध्या ही मालिका टीआरपी चार्टमधील आघाडीची मालिका असल्याचे दिसत आहे. तर शिवानीचा झिम्मा २ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचसोबत तिने 'वाळवी' चित्रपटांतून प्रेक्षकांचे मन जिंकले.

Ajinkya Nanaware Wedding
Saie Tamhankar:...तर तुम्ही जिंकलात, ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरने दिलं सडेतोड उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com