Poonam Pandey: 'माझा द्वेष करा, मला मारून टाका, पण...', ट्रोल करणाऱ्यांकडे पूनम पांडेने केली विनंती

Poonam Pandey Dies Fake News: पूनम पांडेला मृत्यूचे हे खोटं नाटक करणं आता चांगलेच महागात पडले आहे. पूनम पांडेच्या या कृत्यावर संताप व्यक्त करत नेटिझन्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. अशामध्ये पूनम पांडेने सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोल करणाऱ्याना विनंती केली आहे.
Poonam Pandey
Poonam PandeyInstagram
Published On

Poonam Pandey Instagram Post:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूनम पांडेने स्वत:च्याच मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाल्याचे पूनम पांडेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत सांगितले होते. तिच्या निधनामुळे (Poonam Pandey Death) सर्वांना मोठा धक्का बसला होता. पूनम पांडेला मृत्यूचे हे खोटं नाटक करणं आता चांगलेच महागात पडले आहे. पूनम पांडेच्या या कृत्यावर संताप व्यक्त करत नेटिझन्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. अशामध्ये पूनम पांडेने सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोल करणाऱ्याना विनंती केली आहे.

पूनम पांडेने आधी मृत्यूची अफवा पसरवली, नंतर रविवारी व्हिडीओ पोस्ट करत आपण जीवंत असल्याचे सांगितले. पूनम पांडेने हे सर्व कृत्य गर्भाशयाच्या कॅन्सरच्या जनजागृतीसाठी केलं असल्याचे सांगितले खरे पण तिचे हे वागणं तिच्या चाहत्यांसह काही सेलिब्रिटींना देखील पटले नाही. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त करत आहेत. पूनम पांडेने पब्लिसिटी स्टंटसाठी हे सर्व कृत्य केल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. आता या सर्व ट्रोलिंगला वैतागून पूनम पांडने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

पूनम पांडेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. पूनम पांडेला तिच्या मृत्यूबाबतच्या कृत्यासाठी मदत करणाऱ्या शाबांग कंपनीने काल माफीनामा जाहीर केला होता. पूनम पांडेने या कंपनीच्याच या पोस्टचा फोटो इन्स्टा स्टोरीवर टाकला आहे. त्यावर तिने असे लिहिले की, 'मला मारून टाका, मला फासावर लटकवा, माझा द्वेष करा पण तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना वाचवा.'अशा पद्धतीने पूनम पांडेने ट्रोलिंग करणाऱ्यांना विनंती केली आहे. सध्या पूनम पांडेचे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाबांग कंपनीने आपल्या माफीनाम्यामध्ये असे लिहिले होते की, 'होय, हॉटरफ्लायच्या मदतीने आम्ही पूनम पांडेसोबत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमात सहभागी होतो. यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. विशेषत: ज्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो. या पोस्टद्वारे आमचा उद्देश फक्त लोकांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवणे आहे. 2022 पासून, भारतात 123,907 गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रकरणे आणि 77,348 मृत्यूची नोंद झाली आहे. स्तनाच्या कर्करोगानंतर मध्यमवर्गीय महिलांना होणारा हा दुसरा सर्वात धोकादायक आजार आहे.'

दरम्यान, पूनम पांडेने आपल्या मृत्यूच्या अफवांनंतर रविवारी आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितलेहोते की, 'तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजागा आहे. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे.'

Poonam Pandey
Ajinkya Nanaware Wedding: अन् अजिंक्यने लग्नामध्येच सासू-सासऱ्यांचे आभार मानले, म्हणाला - 'तुम्ही तुमची सोन्यासारखी मुलगी...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com