'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या रिॲलिटी शोमुळे प्राजक्ता माळी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या हास्यजत्रेची टीम सध्या सिंगापूरची सफर करीत आहे. प्राजक्ता एक उत्तम अभिनेत्री आणि होस्ट असून ती एक बिझनेस वुमन सुद्धा आहे. गेल्या वर्षी प्राजक्ताने 'प्राजक्ताराज' नावाचा ज्वेलरी ब्रँड लॉंच केला होता. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांसाठी एक 'गुड न्यूज' दिली आहे. (Marathi Actress)
सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम परदेश दौऱ्यावर आहे. अवघी टीम परदेशामध्ये आपल्या सुट्टीचा आनंद मनमुराद लुटताना दिसत आहे. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत थेट सिंगापूरातून 'प्राजक्ताराज'च्या प्रेक्षकांसाठी खास नजराना दिलेला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर अवघ्या काही मिनिटांचं लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमधून तिने 'प्राजक्ताराज'चे नवं प्रॉडक्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. (Social Media)
प्राजक्ता आपल्या इन्स्टा लाईव्हवर म्हणते, "नमस्कार मंडळी, आज आपण 'प्राजक्तराज पारंपारिक मराठी साज'मध्ये नवा दागिना लाँच करणार आहोत. आज मला खूप आनंद होतोय कारण मी हा दागिना सिंगापूरमधून लाँच करीत आहोत. आज आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आलो आहोत. युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये सर्वच मंडळी एन्जॉय करीत आहेत. प्राजक्तराजचा आज दागिना लाँच होता म्हणून मी इथे खाली उभी आहे. तुम्हा सर्वांचच या लाईव्हमध्ये स्वागत आहे." (Viral Video)
"आज कोणता दागिने लाँच होणार हा प्रश्न तुम्हाला मी विचारूनच देणार नाही. कारण तो दागिनाच मी परिधान केलेला आहे. आज वज्रटीक लॉंच झालेली आहे. अनेक देवदेवतांनीही हा साज परिधान केलेला आहे. आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण 'मोकळ्या घसाची वज्रटीक' लाँच करीत आहोत." असं म्हणत अभिनेत्रीने या दागिन्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
यावेळी प्राजक्ताने या दागिन्याचे वैशिष्ट्यही सांगितले. हा दागिने कसा बनला जातो याबद्दलही अभिनेत्रीने चाहत्यांना माहिती दिली आहे.
हा दागिना प्रेक्षकांना म्हाळसा कलेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. हा दागिना तुम्ही म्हाळसा कलेक्शनमधून खरेदी करू शकणार आहात. अवघ्या काही तासातच प्राजक्ताच्या या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज देखील मिळाले आहेत. प्राजक्ताने २०२३ मध्ये जानेवारी महिन्यात नवीन ज्वेलरी ब्रँड लाँच केला आहे. यामध्ये अनेक मराठमोळे अलंकार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.