Jasmin Bhasin Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jasmin Bhasin: प्रसिद्ध अभिनेत्रीला बर्थडे ट्रिप पडली महागात; दुबईत अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात हलवलं

Jasmin Bhasin: दुबईत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या जस्मिन भसीनची प्रकृती अचानक बिघडली. गंभीर संसर्गामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अली गोनीने भावनिक पोस्ट शेअर केली.

Shruti Vilas Kadam

Jasmin Bhasin: टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला दुबईतील रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. प्रियकर आणि अभिनेता अली गोनीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. जस्मिनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघे दुबईला गेले होते. मात्र तिथे तिची अचानक तब्येत बिघडली.

अली गोनीने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जस्मिन त्याचा हात धरून असल्याचे दिसते. या पोस्टमध्ये अलीने लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, जस्मिन. आपण तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलो होतो, पण नशिबात काहीतरी वेगळेच होते. वाढदिवसाच्या आठवणी तयार करण्याऐवजी आपण रुग्णालयात आहोत. तुला वेदनेत पाहणे हा या प्रवासातील सर्वात कठीण क्षण होता. तू पुन्हा हेल्दी आणि आनंदी बघण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे."

याशिवाय अलीने जस्मिनसाठी प्रार्थना करत, "अल्लाह तुला उत्तम आरोग्य, आनंद, प्रेम आणि यश देवो. तू लवकर बरी हो, हीच माझी तुझ्या वाढदिवसाची इच्छा आहे. माझे तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील," असेही म्हटले.

यानंतर अलीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे जस्मिनच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती दिली. त्याने सांगितले की, दुबईत आल्यानंतर जस्मिनला अचानक इन्फेक्शन झाले आणि त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या काही दिवसांपासून दोघांसाठी हा काळ अत्यंत कठीण होता. सध्या जस्मिनवर योग्य उपचार सुरू असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. तिला लवकर बरे वाटावे यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, असे आवाहनही त्याने चाहत्यांना केले.

अली गोनी आणि जस्मिन भसीन यांची पहिली भेट २०१८ मध्ये 'खतरों के खिलाडी ९' या रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. मात्र 'बिग बॉस १४'मध्ये सहभागी झाल्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकत्र असून सोशल मीडियावर त्यांच्याखास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : नवीन कपडे पहिल्यांदा धुतल्यानंतर रंग जातो? 'हे' उपाय घरच्या घरी करा ट्राय

Natural Pink Glow: कश्मिरी मुलींसारखा नॅचरल गुलाबी ग्लो पाहिजे? मग घरीच तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरा

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील रस्त्यांसह महामार्गांचीही दुरवस्था, नागरिकांचे प्रचंड हाल

भाजपचा विधानसभेसाठी मास्टरप्लॅन! राज्यपातळीवर पक्षात मोठे बदल; कोणाची कुठे नियुक्ती?

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT