Janhvi Kapoor Trolled For Ramp Walk Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor : 'तुला उशीर होतोय...?' लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'बाउन्सी' रॅम्प वॉकसाठी जान्हवी ट्रोल, नेटकरी संतापले

Janhvi Kapoor Trolled For Ramp Walk: शनिवारी लॅक्मे फॅशन वीकमधील वॉकसाठी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला खूप ट्रोल करण्यात येत आहे. कलाकारांनी खऱ्या मॉडेल्सची जागा घ्यावी का? असा प्रश्न नेटिझन्सनी विचारत आहेत.

Shruti Vilas Kadam

Janhvi Kapoor Ramp Walk: शनिवारी लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला तिच्या वॉकसाठी खूप ट्रोल करण्यात येत आहे. नेटिझन्सना असे वाटले की ती कुठेतरी पोहोचण्याची घाई करत आहे आणि तिच्या वॉकमुळे पुन्हा एकदा कलाकारांनी खऱ्या मॉडेल्सची जागा घ्यावी का या वादाला तोंड फुटले आहे.

जान्हवी शनिवारी राहुल मिश्राच्या रॅम्प मध्ये शो- स्टॉपर म्हणून सहभागी झाली होती. तिने चमकदार काळ्या बॉडीकॉन गाऊनआणि स्टिलेटो घातला होता. अभिनेत्रीने तिच्या हावभावांनी आत्मविश्वास आणि उत्साह दाखवला, परंतु ती तिच्या चालण्याने इंटरनेट फॅशन फॉलोवर्सना प्रभावित करण्यात अपयशी ठरली.

इंस्टाग्रामवर जान्हवीच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओवर एका नेटकाऱ्याने लिहिले, "हे खऱ्या मॉडेल्सचा अपमान आहे," तर दुसऱ्याने प्रश्न केला, "तुला उशीर होतोय कुठे जाण्यासाठी...?' किती वाईट वॉक आहे हा. शरीर स्थिर असेल तर तुझ्या ड्रेसवर लोकांचा लक्ष जाईल ही साधी गोष्ट तुला माहिती नाही का?'

जान्हवीची रॅम्पवर चालण्यासाची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वेळी जेव्हा तिच्यावर टीका झाली होती तेव्हा नेटकऱ्यांना वाटले होते की ती खूप हळू चालत होती, इतकी की ती "स्लीप वॉकिंग" करत असल्यासारखी दिसत होती. गेल्या वर्षी जूनमध्ये पॅरिस हॉट कॉउचर वीकमध्ये डिझायनर राहुल मिश्रा यांच्यासाठीत तिने वॉक केला होता.

दरम्यान, जान्हवीच्या कामाबाबतीत बोलायचे झाले तर, जान्हवी सध्या सनी संस्कार की तुलसी कुमारी आणि परम सुंदरी या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती तिच्या बावलमधील सह-कलाकार वरुण धवनसोबत सनी संस्कार की तुलसी कुमारीमध्ये पुन्हा एकत्र येणार आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT