Neha Kakkar Concert Controversy: नेहा कक्करचे आरोप खोटे? मेलबर्नच्या आयोजकांनी VIDEO शेअर करून केला धक्कादायक खुलासा

Neha Kakkar Concert Controversy: गायिका नेहा कक्करच्या मेलबर्न कॉन्सर्टवरील वादात आता आयोजकांनी नेहावर आरोप करुन काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
Neha Kakkar
Neha KakkarSaam Tv
Published On

Neha Kakkar Concert Controversy: गायिका नेहा कक्करच्या मेलबर्न कॉन्सर्टवरील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या गायिकेवर संगीत कार्यक्रमाला ३ तास ​​उशिरा पोहोचल्याचा आरोप होता आणि ती स्टेजवर येताच रडू लागली, त्यानंतर तिला बरीच टीका सहन करावी लागली. या घटनेनंतर, नेहाने तिचे स्पष्टीकरण देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि शो आयोजक बीट्स प्रॉडक्शनवर अनेक गंभीर आरोप केले, जसे की, थकबाकी न भरणे आणि गैरव्यवस्थापन. आता पहिल्यांदाच, आयोजकांनी या प्रकरणावर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे,त्यामध्ये त्यांनी गायिकेच्या आरोपांचे खंडन करताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

शोच्या प्रायोजकाने सोशल मीडियावर बिलाचे काही स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की नेहाच्या मेलबर्न आणि सिडनी येथील संगीत कार्यक्रमांमधून सुमारे ५,२९,००० डॉलर्स म्हणजेच ४.५२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Neha Kakkar
Salman Khan crazy Fan: 'सिकंदर'साठी फॅन्स क्रेझी; चाहत्याने मोफत वाटली १.७२ लाख रुपयांची तिकिटे, VIDEO व्हायरल

नेहा कक्करने दावा केला की तिला आयोजकांनी हॉटेल आणि वाहतूक सुविधा पुरवल्या नव्हत्या. यामुळे ती वेळेवर कार्यक्रमाला पोहोचू शकली नाही. आयोजक कंपनीने गायिकेच्या आरोपांना प्रत्युत्तर देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नेहाचे दावे खोटे असल्याचे उघड झाले.

Neha Kakkar
Sikandar Box Office Collection Day 1: सलमान खानचा 'सिकंदर' मोडणार 'छावा'चे रेकॉर्ड; पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी

याशिवाय, आयोजकांनी नेहावर गंभीर आरोप केले आणि म्हटले की सिडनी, मेलबर्न आणि पर्थमधील क्राउन टॉवर्सने तिच्यावर बंदी घातली आहे. कारण नेहा आणि तिच्या मैत्रिणी हॉटेलच्या खोल्यांमध्ये निषिद्ध असूनही धूम्रपान करत होत्या, एवढेच नाही तर आयोजकांनी एक इनव्हॉइस देखील शेअर केला आहे आणि लिहिले आहे - 'क्राउन टॉवर्स सिडनीला कॉल करा आणि हॉटेलमध्ये कोणी धूम्रपान केले ते शोधा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com