Sikandar Box Office Collection Day 1: सलमान खानचा 'सिकंदर' मोडणार 'छावा'चे रेकॉर्ड; पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी

Sikandar Box Office Collection Day 1: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' आज ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
sikandar New song
sikandar New songSaam Tv
Published On

Sikandar Box Office Collection Day 1: सलमान खानचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट 'सिकंदर' आज ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. ईद-उल-फित्रच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियावाला निर्मित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये त्याने किती कमाई केली आहे? चला जाणून घेऊया.

सिकंदर अॅडव्हान्स बुकिंग

अपेक्षेप्रमाणे 'सिकंदर अॅडव्हान्स बुकिंग' मोठ्या प्रमाणात झाली आहे. जवळजवळ १,२५,००० ते १,५०,००० तिकिटे आधीच विकली गेली आहेत. सूत्रांच्या मते, पहिल्या दिवशीचा कलेक्शन २८ कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्टिंग वेबसाइट सॅकनिल्कनुसार पहिल्या दिवसाचा कलेक्शन ०.७७ कोटी आहे. हा एक प्रारंभिक अंदाज आहे, तो लवकरच अपडेट केला जाईल.

sikandar New song
Swati Sachdeva: 'काही मर्यादा...', रणवीरनंतर आता स्वाती सचदेवाने स्वतःच्याच आईवर केले अश्लील विनोद, नेटकरी संतापले

या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. त्यांच्याशिवाय, चित्रपटात काजल अग्रवाल, सत्यराज, शरमन जोशी, प्रतिक बब्बर आदी कलाकार आहेत. सलमान खानने हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित केला. यापूर्वी 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर ३' बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नव्हते. दोघांनीही ३० ते ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती, जी इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

sikandar New song
Sikandar New Song: 'सिकंदर'च्या प्रदर्शनाआधी 'हम आपके बिना' गाणं रिलीज; चित्रपटाची उत्सुकता वाढली

सिकंदरची कथा

सिकंदर चित्रपटात, सलमान खान दुहेरी भूमिका साकारत आहे, संजय राजकोट आणि मुख्य पात्र सिकंदर असे डबल रोल सलमान खान करणार आहे.चित्रपटाचे कथानक भ्रष्टाचाराला आव्हान देणाऱ्या आणि न्यायासाठी लढणाऱ्या तरुणाभोवती फिरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com