The True History of Lyari Revealed Saam
मनोरंजन बातम्या

धुरंदर चित्रपटातील लियारी टाऊनची खरी गोष्ट; आता हे शहर कसं दिसतं? गुन्हेगारांवर आळा कसा बसला?

The True History of Lyari Revealed: धुरंधर चित्रपटामुळे लियारी टाऊन चर्चेत आलं. कुख्यात गुंड रहमान डकैत आणि उझैर बलोच हे लियारीतील प्रमुख गुन्हेगार होते.

Bhagyashree Kamble

सध्या बॉलिवूडला सुगीचे दिवस आले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण धुरंधर हा चित्रपट बॉक्स ऑफिसरवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सूक आहेत. या चित्रपटात पाकिस्तानमधील कराची येथील लियारी टाऊन दाखवण्यात आलं आहे. या शहरातील टोळीयुद्ध, पोलीस कारवाया आणि गुन्हेगारीचं अंधकारमय जग दाखवण्यात आलं आहे. ल्यारीमध्ये गुन्हेगारी नेमकी कशी सुरू झाली? लियारी टाऊनचा इतिहास काय? पाहूयात.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये लियारी टाऊन हे शहर वसलेलं आहे. हे टाऊन पाकिस्तानमधील एक ऐतिहासिक आणि दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. लियारी टाऊन अलिकडेच 'धुरंधर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आलं आहे. कारण हा भाग गँगवार, गुन्हेगारी आणि खास फुटबॉलसाठी ओळखला जातो.

लियारी हा भाग सुमारे ६ चौरसमीटर किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. २०२३च्या जनगणनेनुसार येथे सुमारे १० लाख लोकसंख्या आहे. लियारीमध्ये बलुच, सिंधी, उर्दू, पश्तून आणि पंजाबी भाषित लोकांची मोठी वस्ती आहे. १९८० ते १९९० च्या दशकात कराचीमध्ये गुन्हेगारी वाढू लागली होती. मात्र, पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली.

त्याकाळी कुख्यात रहमान डकैतची दहशत होती. धुरंधर या चित्रपटात रहमान डकैतची भूमिका अक्षय खन्नाने साकारली. मिळालेल्या माहितीनुसार, २०००च्या दशकात रहमान डकैतने लियारीच्य बेकायदेशीर अर्थव्यवस्थेच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले होते. यात ड्रग्ज, तस्करी, खंडणी आणि जुगार रॅकेट यांचा समावेश होता.

त्यानं लोकांमध्ये वेगळी प्रतिमा तयार करण्यासाठी लहान दवाखाने, मदरसे, फुटबॉल स्पर्धा तसेच शाळांना निधी दिली. त्यानं अशारित्या स्थानिकांमध्ये पकड मजबूत केली. २००८ साली त्यानं 'पीपल्स अमन कमिटी' या संघटनेची स्थापना केली. लियारीच्या गुन्हेगारी जगतात आणखी एक मोठं नाव म्हणजे उझैर बलोच. २००९ साली रहमान डकैतच्या मृत्यूनंतर उझैर बलोचनेही अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे केले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये लियारीमध्ये केलेल्या कारवाईनंतर उझैर बलोचला अटक करण्यात आली. २०२० साली त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे.

आता लियारीची परिस्थिती कशी आहे?

लियारीची जी स्थिती धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तसं लियारी आता राहिलेलं नाही. आजची परिस्थिती बदलली आहे. गुन्हेगारांचं जाळं आता जवळजवळ साफ झाले. तिकडचे रहिवासी आता रोजगार, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देत आहे. बीबीसी रिपोर्ट्सनुसार लियारीतील तरूणांनी आतंरराष्ट्रीय फूटबॉल स्पर्धांतही भाग घेतला आहे. एकेकाळी पाकिस्तानातील सर्वात धोकादायक मानला जाणारा लियारी शहर आता पाकिस्तानचा मिनी ब्राझील म्हणूनही ओळखला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्रिजमधील लिंबूही लगेच सुकतात? 'ही' ट्रिक फॉलो करा, Lemon राहतील ताजे

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी, २१०० रुपये, बोगस लाभार्थी... लाडकी बहीण योजनेवर मंत्री आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान

Maharashtra Live News Update: पुढील पंधरा दिवस कसबा गणपती मंदिर बंद राहणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹ २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली मोठी अपडेट

Walking Mistakes: वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जाताय? मग या चुका होणार नाहीत याची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT