EPFOचा मोठा निर्णय! PF वरील नवीन व्याजदर निश्चित; किती असणार? वाचा सविस्तर

EPFO PF Interest Rate: ईपीएफओने पीएफ खात्यावरील व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी व्याजदर ८.२५ टक्के निश्चित करण्यात आले आहे.
EPF Calculation
EPF CalculationSaam Tv
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने २०२५-२६ साठी पीएफ खात्यावरील व्याजदर निश्चित केले आहे. काल झालेल्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीएफ ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के असणार आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही व्याजदर तेच असणार आहे.

ईपीएफओने पीएफवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सलग दुसऱ्या वर्षी व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २०२४-२५ साठी व्याजदर जाहीर केले होते. मागच्या वर्षीदेखील व्याजदर ८.२५ टक्के ठेवले होते.

EPF Calculation
EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

मिडिया रिपोर्टनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने काल याबाबत निर्णय घेतला. सलग दुसऱ्या वर्षी पीएफवरील व्याजदर ८.२५ टक्के ठेवले आहे. याआधी २०२३-२४ मध्ये व्याजदरात किरकोळ वाढ करुन ८.२५ टक्के केली होती. २०२२-२३ मध्ये पीएफवरील व्याजदर ८.१५ टक्के होता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सेंट्रल बोर्डाची काल बैठक झाली. यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अर्थमंत्रालयाच्या मंजुरीसाठी वाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर ईपीएफओ खात्यावर व्याजदर दिले जाईल. कोट्यवधी कर्मचाऱ्यांना हे व्याजदर मिळणार आहे.

EPF Calculation
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; UPI आणि एटीएममधून काढता येणार PF; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठरावीक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. पीएफ खात्यातील जमा रक्कमेवर तुम्हाला व्याजदर दिले जाते. वार्षिक स्वरुपात हे व्याजदर मोजले जाते. हे व्याजदर वाढले तर कर्मचाऱ्यांनाच फायदा होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही नोकरी सोडता किंवा सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफचे पैसे आणि व्याजदर दोन्ही जमा केले जातात. त्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होतो.

EPF Calculation
EPFO 3.0: आता UPI आणि ATM मधून काढता येणार PF; लिमिट किती? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com