Indrayani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : आषाढी एकादशी विशेष; 'इंद्रायणी'ला होणार विठुरायाचा साक्षात्कार, पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update :'इंद्रायणी' मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. लवकरच आषाढी एकादशी विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Maskar

संपूर्ण महाराष्ट्रात वारीचं वातावरण पाहायला मिळत आहे. विठू नामाच्या गजर, टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. आता 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शकुंतलाची तब्येत घरात सगळ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. त्यात मावशीची काळजी घेण्यासाठी गोपाळ घरी परत आला आहे.

इंदू, अधू, व्यंकू महाराज यांचे देखील प्रयत्न सुरूच आहेत. विठूच्या वाडीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कीर्तन होणार असून यंदा शकुंतलाच्या तब्येतीमुळे व्यंकू महाराजांना कीर्तन करणे जमणार नसून गावाबाहेरून पारंपरिक कीर्तनकार देखील येऊ शकत नाही आहे. गावकऱ्यांच्या इच्छेचा मान राखून आणि दिग्रसकर घराण्याची परंपरा पुढे नेत आनंदीच्या विरोधाला सामोरे जाऊन इंदू दिग्रसकरांची सून म्हणून या कीर्तनाची जबाबदारी स्वीकारते. इंद्रायणीचे हे दिग्रसकरांची सून म्हणून पहिले कीर्तन असणार आहे.

आषाढीला इंदूचं कीर्तन ऐकायची शकुंतलाची मनापासून इच्छा आहे. पण तिची तब्येत साथ देईल का, हा मोठा प्रश्न आहे. अचानक त्रास वाढल्यामुळे तिला रुग्णालयात ॲडमिट केले जाते, पण तिला वेळीच उपचार मिळू शकतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शकुंतलाच्या तब्येतीत सुधारणा व्हावी. ती बरी व्हावी म्हणून इंद्रायणी विठ्ठल भक्ती करताना दिसणार आहे. ती आषाढीला विठ्ठलासमोर कीर्तन करणार आहे. त्याला साध घालणार आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी इंद्रायणीला विठुरायाचा साक्षात्कार कसा होणार? इंद्रायणी दिग्रसकरचं कीर्तन कसं होणार? हे सर्व पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग 6 जुलैला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. हा भाग केवळ कीर्तनाचा नाही, तर श्रद्धा, विज्ञान आणि भक्ती यांचा अनोखा संगम दर्शवणारा अनुभव ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT