Indrayani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : अधोक्षज घर सोडून जाणार? 'इंद्रायणी' कसा बदलणार नवऱ्याचा निर्णय, पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update :'इंद्रायणी' मालिकेत पुंडलिकने इंदूला मोठं आव्हान दिले आहे. अशात अधोक्षजने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेत पुढे काय होणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'इंद्रायणी' मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दिग्रसकर कुटुंबात आनंदीचा पुंडलिकला लाच देण्याचा प्रयत्न फसतो. ज्यावरून वातावरण चिघळते आणि दोषारोपाचा भडिमार होताना दिसणार आहे. आनंदी थेट इंदूवर आणि व्यंकूवर आरोप करते. ज्यामुळे अधू भावनिक होतो आणि घर सोडून निघून जाण्याचा मोठा निर्णय घेतो.

मालिकेत इंदूला रात्री एक दृष्टांत येतो. ज्यानंतर इंदूच्या डोक्यात फक्त एकच विचार येतो की, घर आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी तिच्यावरच आहे आणि ती अधूला घर सोडून जाण्यापासून थांबवते. त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करते. आता अधू घर सोडून जाणार का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

इंदू अधूला घर सोडून जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र त्यामुळे त्यांच्या नात्यात अंतर निर्माण होणार का? इंदू समोर उभं असलेले आव्हान ती कसं पार करणार,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इंदू सुनेचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडायला सज्ज झाली आहे. मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिका पाहा. जी संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होते.

सध्या 'इंद्रायणी' मालिकेत इंदू आणि अधूचे खास रोमँटिक क्षण पाहायला मिळत आहेत. आदू इंदूला बाहेर घेऊन जातो. तिच्यासोबत निवांत वेळ घालवतो. जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले पाहायला मिळतात. दिग्रसकरांच्या गादीवर डोळा ठेवणारा आणि अधूचा अपमान करणाऱ्या पुंडलिकला इंदू येणाऱ्या भागांमध्ये चोख उत्तर देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT