Shruti Vilas Kadam
रवि किशन स्टारर ही हलकीफुलकी कोर्टरूम कॉमेडी सीरिज आहे. पटपड़गंज कोर्टातील वकिलांची गमतीदार आणि गंभीर कहाणी दर्शवते.
पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेली ही सिरीज अनेक सत्रांमध्ये गुन्हे, गुन्हेगार, आणि न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत दाखवते.
नेहा शर्मा आणि अक्षय ओबेरॉय स्टारर ही सिरीज एका तरुण वकिलाच्या संघर्षाची कथा आहे, जी कठीण खटल्यांतून जात न्यायासाठी लढते.
जिमी शेरगिल प्रमुख भूमिकेत असलेली ही सिरीज एका न्यायाधीशाच्या नैतिकतेवर आधारित आहे, जो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कायद्याच्या चौकटीबाहेर जातो.
काजोल यांची पहिली वेब सिरीज, ज्यात त्या एका वकिलाच्या भूमिकेत आहेत. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील संघर्ष उलगडले आहेत.
शकुंतला आणि काशाफ या दोन तरुण वकिलांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविध सामाजिक मुद्द्यांवर आधारित खटल्यांची मालिका.
जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत असलेली ही सिरीज लष्करातील कोर्ट मार्शल केसवर आधारित आहे. कायदा आणि देशभक्ती यांचा संघर्ष यात दिसतो.