Classical Singer Prabha Atre Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Classical Singer Prabha Atre Dies: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा

Singer Prabha Atre Passed Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Chetan Bodke

Classical Singer Prabha Atre Passed Away

मराठी संगीत क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. (Latest Marathi News)

शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रभा यांचे नातेवाईक परदेशात असल्यामुळे त्यांच्यावर ते भारतात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिनही पुरस्कारांनी प्रभा अत्रे यांना गौरविण्यात आले होते. (Pune News)

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका व प्राध्यापिका म्हणून डॉ. प्रभा अत्रे याचं नाव लौकिक होतं. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अग्रणी नावांपैकी डॉ. प्रभा अत्रे यांचे एक नाव आहे. त्या मुळच्या पुण्यातील असून आई इंदिराबाई अत्रे यांच्या शिकवणीत वयाच्या आठव्या वर्षीच शास्त्रीय गायनाकडे वळल्या. पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याजवळ 'गुरू-शिष्य' शैलीमध्ये प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. (Singer)

शास्त्रीय संगीत शिकत असताना प्रभा अत्रे यांना हिराबाई भारतामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत नेहमी असायच्या. संगीताचे धडे गिरवत असताना प्रभा यांनी विज्ञान कायदा विषयात पदवी घेतली. त्यानंतर संगीतात डॉक्टरेटही केली. प्रभा अत्रे यांनी तरुण वयात 'संगीत शारदा', 'संगीत विद्याहरण', 'संगीत संशयकल्लोळ' अशा विविध संगीत नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख स्त्री भूमिका साकारली. (Marathi Film Industry)

१९५५ पासून प्रभा यांनी देशासह परदेशातही आपले संगीताचे कार्यक्रम करण्यासाठी सुरूवात केली. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संगीत महोत्सवामध्ये आपल्या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर केले होते. देशासह परदेशामध्ये संगीत क्षेत्रामध्ये डॉ. अत्रे यांनी मोलाची कामगिरी केली होती. त्यांनी अनेक ठिकाणे संगीत विषयावर व्याख्याने, विषयांवर विविध संशोधनपर लेखही सादर केले. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्‍या पद्मविभूषण पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी डॉ. अत्रे यांना गौरवण्यात आले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT