Zarina Hashmi Google Doodle Google
मनोरंजन बातम्या

Zarina Hashmi Google Doodle: कोण आहेत झरीना हाशमी? गुगलने डूडलच्या माध्यमातून केलं खास अभिवादन

Who Is Zarina Hashmi: आज गूगलने झरीना हाशमी (Zarina Hashmi) यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल बनवलं आहे.

Chetan Bodke

Google Doodle celebrates Zarina Hashmi: गूगल नेहमीच खास व्यक्तींच्या जयंतीनिमित्त, वाढदिवसानिमित्त किंवा पुण्यतिथिनिमित्त डूडलच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करतं. आज गूगलने झरीना हाशमी (Zarina Hashmi) यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल बनवलं आहे. भारतीय- अमेरिकन अभिनेत्री आणि प्रिंटमेकर झरीना हाशमी यांची आज ८६ वी जयंती आहे. सध्या सोशल मीडियावर झरिना हाशमी यांची तुaफान चर्चा सुरू आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय- अमेरिकन अभिनेत्री झरीना हाशमी यांच्या विषयी...

भारतीय- अमेरिकन अभिनेत्री झरीना हाशमी यांचा जन्म १६ जुलै १९३७ रोजी जन्म झाला. त्यांचा जन्म भारतातील अलिगढ या गावामध्ये झाला होता. भारताची फाळणी होण्यापूर्वी झरीना आपल्या कुटुंबासोबत भारतातच राहत होत्या. पण १९४७ नंतर झरीना आपल्या कुटुंबासोबत पाकिस्तानातील कराचीमध्ये कायमच्या स्थलांतरित झाल्या. वयाच्या २१ व्या वर्षी झरीनाने एका तरुण राजनयिकशी लग्न केले. लग्नानंतर झरीना यांनी बँकॉक, पॅरिस आणि जपानमध्ये गेल्या.

१९७७ मध्ये झरीना यांनी न्यूयॉर्क शहारात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. झरीना यांनी तेथील महिला कलाकारांना मदत केली होती. न्यूयॉर्कमधील हेरिसीज कलेक्टिव्हच्या झरिना सदस्य झाल्या होत्या. राजकारण, कला आणि सामाजिक न्याय अशा अनेक गोष्टींसाठी झरिनाने त्या संस्थेत पुढाकार घेतला. यानंतर झरीनाने न्यूयॉर्क फेमिनिस्ट आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसरची नोकरी केली. या माध्यमातून झरिनाने अनेक महिला कलाकारांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिली. १९८० मध्ये त्या A.I.R मध्ये नोकरीमध्ये रुजू झाल्या. गॅलरी "द डायलेक्टिक ऑफ एलेनेशन: ॲन एक्झिबिशन ऑफ थर्ड वर्ल्ड वुमन आर्टिस्ट्स फ्रॉम युनायटेड स्टेट्स प्रदर्शनाच्या सहआयोजकात सहकार्य केले.

झरीना ह्या जगभरात इंटॅग्लिओ आणि वुडकट प्रिंटसाठी प्रसिद्ध तर होत्या. सोबतच झरीना यांनी फ्रेंच, उर्दू साहित्य, कविता आणि तत्वज्ञानाचा झरीना यांनी अभ्यास केला होता. सोबतच त्या एक उत्तम प्रिंटमेकर होत्या. पण त्यांचं रेखाचित्र, प्रिंटमेकिंग आणि शिल्पकलेत योगदान मोलाचं आहे.

२५ एप्रिल २०२०मध्ये झरीना यांचे निधन झाले. लंडनमध्ये झरिना यांचे अल्झायमरच्या आजाराने निधन झाले होते. एक भारतीय महिला कलाकार म्हणून त्या आजही लोकप्रिय असून त्यांच्या जगातील प्रवासाचा कलेवर परिणाम झाला होता. झरीना यांच्या जयंतीनिमित्त डूडलची डिझाईन न्यूयॉर्कमधील चित्रकार तारा आनंदने डिझाइन केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

SCROLL FOR NEXT