Sara Ali Khan Goes Street Shopping: लक्झरी ब्रँड सोडून रस्त्यावर शॉपिंग करताना स्पॉट झाली सारा, व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Sara Ali Khan Viral Video: सारा अली खान नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि तिच्या साधेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते.
Sara Ali Khan Enjoys Street Shopping In Bandra
Sara Ali Khan Enjoys Street Shopping In Bandra Instagram
Published On

Sara Ali Khan Enjoys Street Shopping In Bandra: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’चित्रपटात सारा अली खानने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. सारा अली खान नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि तिच्या साधेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते.सारा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सारा अली स्ट्रीट शॉपिंग करताना दिसत आहे. सध्या साराचा हा साधेपणा सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे.

Sara Ali Khan Enjoys Street Shopping In Bandra
Katrina Kaif Turns 40: कतरिना १४व्या वर्षीच झाली स्टार; ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदा झळकली, तुम्ही पाहिलाय का?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सारा अली खान तिच्या मैत्रिणींसोबत मुंबईतील वांद्रे भागात स्ट्रीट शॉपिंग करताना दिसली. यावेळी साराने शॉर्ट्स आणि ब्लॅक टी-शर्ट परिधान केला होता. अभिनेत्रीचा हा साधा सिंपल लूक नेटकऱ्यांना कमालीचा भावला आहे.

सारा स्ट्रीट मार्केटमध्ये दुकानातील कपडे बघत होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये खरेदी करताना अभिनेत्रीच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शेवटी सारा ही एका व्यक्तीकडून सामान घेताना दिसत आहे. यावेळी सारा शॉपिंग करताना अनेक चाहत्यांनी तिच्या सोबत सेल्फी दाखला काढला. यावेळी तिच्याकडून अनेक ऑटोग्राफही घेतला.

साराचा हा सिंपल लूक प्रेक्षकांना फारच भावला असून तिची स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली. तिच्या स्टाईलवर नेटकरी म्हणतात, तू खूपच साधी आहे, कोणत्याही कुटुंबातून आली असली तरी, बॉडीगार्ड शिवाय तू कुठेही फिरते. कौतुकास्पद अशी एकाने कमेंट केली. तर आणखी एक नेटकरी म्हणतो, बॉडीगार्ड शिवाय सारा मार्केटमध्ये गेली. खूपच छान. तर आणखी एकाने तिच्यावर टीका केली, हा साधापणा वैगेरे काही नाही, तिची पीआर टीम तिची पब्लिसिटी करण्यात व्यस्त आहे.

Sara Ali Khan Enjoys Street Shopping In Bandra
Mahesh Kothare Mother Passed Away: महेश कोठारेंना मातृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे , सारा अली खान नुकतंच ‘जरा हटके जरा बचके’ मध्ये विकी कौशल सोबत दिसली होती. याशिवाय ती ‘ए वतन मेरे वतन’मध्ये देखील ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सोबतच ती ‘मेट्रो...इन डिनॉन’ मध्ये देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com