Katrina Kaif Turns 40: कतरिना १४व्या वर्षीच झाली स्टार; ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदा झळकली, तुम्ही पाहिलाय का?

कतरिनाने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरूवात २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बूम’या चित्रपटातून केली होती.
Katrina Kaif Turns 40
Katrina Kaif Turns 40Instagram @katrinakaif

Happy Birthday Katrina Kaif: बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अशा ग्लॅमरस सौंदर्यवतीचा आज अर्थात १६ जुलै रोजी वाढदिवस आहे. आज अभिनेत्रीचा ४० वा वाढदिवस आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री कतरिना बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे. कतरिनाचा कैफचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगमधील टर्कोटे कुल येथे झाला. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ती आपल्या कुटुंबासोबत हवाईला स्थायिक झाली. आणि त्यानंतर ती लंडनमध्ये स्थायिक झाली.

कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते. तर कतरिनाची आई सुझान टॉर्क्वे मूळची ब्रिटिश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जेव्हा लहान होती त्यावेळी तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. अशा परिस्थितीत तिच्या आईनेच तिला आणि बहीण ईशा बेलाचा सांभाळ केला.

Katrina Kaif Turns 40
Mahesh Kothare Mother Passed Away: महेश कोठारेंना मातृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

कतरिना कैफ नेहमीच आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकची आणि सौंदर्याचीही चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा असते. विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री सर्वाधिक चर्चेत नाही. तिने आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वयाच्या १४ व्या वर्षातच कतरिनाने पराक्रम करून नाव कमावले होते. अभिनेत्रीने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरूवात २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बूम’या चित्रपटातून केली होती. तिने आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांना बोल्ड सीन्स दिल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. ‘बूम’या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांनी केली होती.

Katrina Kaif Turns 40
Salman Khan Helped Rahul Roy : देवासारखा धावून आला सलमान खान...आशिकी फेम राहुल रॉयचे वाचवले प्राण

चित्रपटाचे दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी कतरिनाला एका फॅशन शोमध्ये पाहिले होते. त्यानंतर तिला ‘बूम’या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. सलमानसोबत प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटातून अभिनेत्री फारच प्रकाशझोतात आली होती.

त्यानंतर सलग दोन दशकं अभिनेत्रीने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. कतरिनाने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी हवाई येथील सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने एका ज्वेलरी ब्रँडसाठी पहिली मॉडेलिंग मिळाली होती.तिने लंडन फ्रिलान्स म्हणून मॉडेलिंग देखील केली होती. कतरिनाला मॉडेलिंगची फारच आवड असल्याने तिने लंडनमध्ये फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक केला होता.

Katrina Kaif Turns 40
Abhishek Bachchan In Politics : अभिषेक बच्चनचे आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल; राजकारणात करणार प्रवेश...

कतरिनाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिचं लव्ह लाईफ हे फारच चर्चेचा विषय होता. तिने पहिल्यांदा सलमानला डेट केले होते. कतरिनाने आधीच सलमान सोबत रिलेशन आहे, हे स्पष्ट केले होते. काही काळासाठी सलमान- कतरिना लिव्ह इन रिलेशनमध्ये देखील होते. पण काही कारणास्तव २०१६ मध्ये दोघांचंही ब्रेकअप झालं. तर २०२१ मध्ये विकी- कतरिनाने एकत्र लग्नगाठ बांधली.कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सलमानसोबत ‘टायगर ३’ मध्ये झळकणार आहे, तर प्रियंका आणि आलियासोबत कतरिना ‘जी ले जरा’मध्ये झळकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com