Ikkis Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Ikkis Collection : अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' सिनेमा फ्लॉप? दुसऱ्या दिवशी कमाईत घसरण

Ikkis Box Office Collection Day 2 : धमेंद्र यांच्या 'इक्कीस' चित्रपटाच्या कमाईत घट झालेली पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत सिनेमाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'इक्कीस' चित्रपट 1 जानेवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'इक्कीस' धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

अगस्त्य नंदाच्या 'इक्कीस' चित्रपटाच्या कमाईत घट झालेली पाहायला मिळत आहे.

अगस्त्य नंदाचा पहिला चित्रपट 'इक्कीस' 1 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचा शेवटचा ठरला. धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षक थिएटरमध्ये येत आहेत. मात्र रिलीजच्या दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली आहे. मात्र वीकेंडला चित्रपट बंपर कमाई करेल असे बोले जात आहे. 'इक्कीस' चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे कलेक्शन पाहूया.

'इक्कीस' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

'इक्कीस' चित्रपटाने बंपर ओपनिंग केली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत 10 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 7.00 कोटी रुपये कमावले आहेत. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'इक्कीस' ने दुसऱ्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन तब्बल 10.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

'इक्कीस' स्टार कास्ट

'इक्कीस' चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात धर्मेंद्र, अगस्त्य नंदा यांच्यासोबत जयदीप अहलावत, आद्यांशी कपूर, एकवली खन्ना, सिमर भाटिया, श्री बिश्नोई, सिकंदर खेर हे कलाकार झळकले आहेत. चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसत आहे.

'इक्कीस' ओटीटी रिलीज

मीडिया रिपोर्टनुसार,'इक्कीस' चित्रपटाचे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडिओने खरेदी केले आहेत. थिएटर गाजवल्यावर चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येणार आहे. असे बोले जाते की, चित्रपट ओटीटीवर मार्च महिन्यात पाहायला मिळेल. मात्र अद्याप अधिकृत रित्या कोणतीही रिलीज डेट समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: कोडवर्डवाले २५०० नंबर; अशोक खरातच्या मोबाइलमधील मायाजाल पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

मोठी दुर्घटना! कराडमध्ये केमिकल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट अन् अग्नितांडव, पाहा व्हिडिओ

Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

SCROLL FOR NEXT