Famous Actress : घटस्फोटाच्या ४ वर्षांनी अभिनेत्री पुन्हा प्रेमात, रोमँटिक VIDEO शेअर करत दिली नात्याची कबुली

Famous Actress Confirms Relationship : प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेत्री घटस्फोटाच्या चार वर्षांनी पुन्हा प्रेमात पडली आहे.
Famous Actress Confirms Relationship
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

2021 मध्ये अभिनेत्रीचा घटस्फोट झाला होता.

कीर्तीने बॉयफ्रेंडसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.

नोव्हेंबर 2025 पासून मनोरंजन सृष्टीत प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. काही लग्न बंधनात अडकले आहेत तर काहींना आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण कलाकार आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने अभिनेता राजीव सिद्धार्थसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या दोघांनी 'फोर मोर शॉट्स प्लीज' चा वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले आहे. कीर्ती आता 40 वर्षांची आहे. तिचा पहिला घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर 4 वर्षांनी पुन्हा प्रेमात पडली आहे. व्हिडीओत कीर्ती आणि राजीव सिद्धार्थचे अनेक रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहे. दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसत आहे. त्यामुळे ही दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

कीर्तीने व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते...नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना हॅप्पी 2026..." या पोस्टवर चाहते आणि कलाकार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. व्हिडीओत यांच्या कॉफी डेट्स, कार सेल्फी, एकत्र फिरण्याचे, काम करण्याचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहे. दोघे एकत्र खूपच खुश आहेत.

कीर्ती कुल्हारीचे पहिले लग्न अभिनेता साहिल सहगलसोबत झाले होते. कीर्ती कुल्हारी आणि साहिल सहगलने 2016 ला लग्नगाठ बांधली आणि 2021 ला दोघे विभक्त झाले. लग्नाच्या 5 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला आणि आता कीर्ती कुल्हारीने आपल्या नवीन नात्याला सुरुवात केली आहे.

Famous Actress Confirms Relationship
Famous Actor : दारूच्या नशेत अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com