Hrishikesh Joshi on Angelo Mathews Facebook
मनोरंजन बातम्या

Hrishikesh Joshi on Angelo Mathews: ‘हेल्मेट रागाच्या भरात फेकून…’ मराठी अभिनेत्याने अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर केलं परखड भाष्य

Hrishikesh Joshi Post: मराठमोळा अभिनेता हृषिकेश जोशीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अ‍ॅंजेलो मॅथ्युजचं उदाहरण देत थेट ट्रॅफिक नियमांवर बोट ठेवलंय.

Chetan Bodke

Hrishikesh Joshi on Angelo Mathews

नुकताच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघामध्ये मॅच खेळवण्यात आली. या मॅचवेळी अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊटमुळे बाद करण्यात आलं. त्यामुळे श्रीलंकेची पाचवी विकेट गेली. असा प्रकार यापूर्वी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडला नव्हता. या घटनेवर मराठमोळा अभिनेता हृषिकेश जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये अ‍ॅंजेलो मॅथ्युजचं उदाहरण देत थेट ट्रॅफिक नियमांवर बोट ठेवलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हषिकेश जोशीने पोस्टमध्ये लिहिलं की, “आउट होण्याचे १० प्रकार आहेत त्यातले ९ आपण बघितलेत पण १०व्या नियमाचं उदाहरण कधी बघायला मिळालं नव्हतं. तो पोर्शन आज अँजेलो मॅथ्यूजने पूर्ण केला. हा खेळायला आला आणि हेल्मेटचा बेल्ट लावण्यात वेळ गेला, मग दुसरं मागवलं यात एकही बॉल न खेळता ३ मिनिटं गेली आणि त्याला TIME OUT या नियमात आउट दिले गेले... अँजेलो, अरे येतानाच चांगलं हेल्मेट घालून यायचं रे.... ”

“आयुष्यात एकेक मिनिट किती महत्वाचा आहे बाबा... आधीच अनेक गावांत हेल्मेट घालत नाहीत, त्यात मुंबईसारख्या शहरात तर पोलीस हमखास पकडतात... पण १००/२००ची पावती किंवा ऑनलाइन दंड भरून तुमची गाडी जाते तरी पुढं... पण तुझी ही पावती केवढ्याला फाटली बघ... एकही बॉल न खेळता सिंहली भाषेत शिव्या देत देत आधीच खराब असलेलं तुझं हेल्मेट रागाच्या भरात फेकून द्यावं लागलं तुला... यातून काय धडा मिळतो की,

1)वेळेचं पालन हा असाही हास्यास्पद विषय ठरतो आणि

2) बाहेर पडताना हेल्मेट आधीच चेक करून बाहेर पडणे.

#वाहतुक नियंत्रण, मुंबई पोलीस.. यांना समर्पित” अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ही घटना पहिल्यांदाच घडली असून श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्या दरम्यान घटना घडली. हा सामना काल दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT