Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5'नं ओलांडला १०० कोटींचा टप्पा, मात्र चौथ्या दिवशी कमाईत घसरण

Housefull 5 Box Office Collection Day 4: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मात्र चौथ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चे चौथ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 4

'हाऊसफुल 5'च्या कमाईत घट झालेली पाहायला मिळाली आहे. चित्रपटाने पहिले तीन दिवस बंपर कलेक्शन केले आहे. मात्र 'हाऊसफुल 5' सोमवारच्या कलेक्शमध्ये अपयशी ठरला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 24 कोटी रुपयांची कमाई केली. तर वीकेंडला या चित्रपटाने सर्वांत जास्त कमाई करून 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'हाऊसफुल 5'ने शनिवारी 31 कोटी तर रविवारी 32 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता सोमवारच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. मात्र या आकड्यांनुसार रविवारच्या तुलनेत 'हाऊसफुल 5'च्या कमाईत घसरण झाली आहे. 'हाऊसफुल 5'ने रिलीजच्या चौथा दिवशी सोमवारी 13.50 कोटी रुपयांचे कमाई केली आहे. यामुळे आतापर्यंत चार दिवसांत 'हाऊसफुल 5'ने तब्बल 101 कोटी रुपये कमावले आहे.

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13.50 कोटी रुपये

  • एकूण - 101 कोटी रुपये

भविष्यात हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असे बोले जात आहे. चित्रपट लवकरच आपले बजेट देखील वसूल करेल. 'हाऊसफुल 5' चित्रपट त्याच्या वेगवेगळ्या आणि धमाकेदार क्लायमॅक्समुळे चांगला चर्चेत आहे.

'हाऊसफुल 5' चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन यांची भन्नाट कॉमेडी पाहायला मिळत आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT