Hollywood makeup artist and influencer Ava Gillies passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Makeup influencer Death: प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सरचे कार अपघातात मृत्यू; वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Famous makeup influencer Death: प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सरचे वयाच्या २६व्या वर्षी भीषण कार अपघातात निधन झाले. तिच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

Shruti Vilas Kadam

Famous makeup influencer Death: हॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सर आवा गिलीज (Ava Gillies)चे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या कौशल्यामुळे कमी वयातच आवाने हॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कार अपघातात आवा गिलीजचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी तिच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार, सहकारी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आवा गिलीज आपल्या क्रिएटिव्ह मेकअपसाठी प्रसिद्ध होती. तिने अनेक कलाकारांसोबत काम करत आपल्या कामातून वेगळी छाप पाडली होती. तिच्या साध्या स्वभाव, मेहनत आणि कामावरील प्रेमामुळे ती सहकाऱ्यांमध्येही लोकप्रिय होती.

आवाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक अत्यंत भावुक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी लिहिले, 'आवा, आम्ही तुला सदैव लक्षात ठेवू तुझी ती चपळ बुद्धी, तुझे आकर्षक व्यक्तिमत्त्व, तुझे सौंदर्य, तुझा अफाट आत्मविश्वास, तुझी अनेकविध कौशल्ये आणि चित्रपट व टीव्हीसाठी मेकअप करण्यासाठीची तुझी जिद्द. आमच्यासोबत घालवलेल्या त्या जवळपास २७ वर्षांच्या काळात ज्यात तुझे शिक्षण, प्रवास आणि काम यांचा समावेश होता तू खूप काही साध्य केलेस. तुला वाढवणे आणि तुझ्यावर प्रेम करणे ही आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट होती.'

अवा गिलीजने पाच वर्षांहून अधिक काळ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तिने 'बार्बी', 'वंडर वुमन १९८४' आणि 'स्नो व्हाईट' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये, तसेच 'ब्रिजर्टन', 'द क्राउन' आणि 'स्टार वॉर्स: द ॲकोलाईट' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT