बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. त्याला 'सनम तेरी कसम' या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन आगामी चित्रपट आणि त्याचा अभ्यास यामुळे चांगचाल चर्चेत आहे. हर्षवर्धन राणे मानसशास्त्र विषयात पदवी घेत आहे. ज्याची परीक्षा सध्या सुरू आहे.
हर्षवर्धन राणेने अलिकडेच मानसशास्त्र विषयाचा एक परीक्षा दिली आहे. मानसशास्त्रीय संशोधन या विषयाचा पेपर त्याने दिला आहे. परीक्षा केंद्रावर त्याच्यासोबत काय घडले याचा एक खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हर्षवर्धन राणेला पाहताच चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. परीक्षा देण्यासाठी आलेली तरुणाई त्याच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. तसेच त्याचा ऑटोग्राफ देखीस घेत आहेत. विशेषता मुलींनी हर्षवर्धन राणेला पाहण्यासाठी, फोटोसाठी गर्दी केली आहे.
हर्षवर्धन राणेला पाहून झालेला आनंद मुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक चाहती "मला तो खूप जास्त आवडतो" असे आनंदाने म्हणताना दिसत आहे. अभिनेत्याने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, फक्त ३ तास झोपलो, आजची परीक्षा संपली. 'मानसशास्त्रीय संशोधन' विषयाचा पेपर खूप चांगले गेला. आजच्या परीक्षेत 84-86% गुण मिळतील अशी आशा आहे."
हर्षवर्धन राणेने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. हर्षवर्धन राणे परीक्षेच्या अभ्यासासोबतच आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. 'सनम तेरी कसम' चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांना आवडत आहे. चाहते हर्षवर्धन राणेच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.