Surabhi Jayashree Jagdish
अनेकदा आपण पाहिलं असेल की, मुलं किंवा मुली चुकीच्या माणसाकडे अधिक आकर्षित होतात
मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं.
मुळात चुकीच्या माणसांकडे आकर्षित होण्याची अनेक मानसशास्त्रीय कारणं असू शकतात.
मनात असलेली एकटेपणा किंवा ओळख मिळवण्याची गरज अनेकदा चुकीच्या माणसाकडे घेऊन जाते.
आपल्याकडे एखादी व्यक्ती जास्त लक्ष देतेय किंवा तर समोरच्याला ते खूप मोठं वाटतं आणि आपण भावनांमध्ये वाहून जातो.
काही वेळा आपण समोरच्याला बदलू शकतो असं वाटतं आणि त्यात अडकतो.
ज्यांना स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःला स्वीकारण्याची सवय नसते, ते इतरांकडून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतात. असावेळी ते चुकीच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात.