Hum Do Hamare Baraah Controversy : सुप्रीम कोर्टाकडून अन्नू कपूर यांच्या 'हमारे बारह'च्या प्रदर्शनाला स्थगिती, नेमकं कारण काय?
Hum Do Hamare Baarah Poster Saam TV
मनोरंजन बातम्या

Hum Do Hamare Baarah Controversy: सुप्रीम कोर्टाकडून अन्नू कपूर यांच्या 'हमारे बारह'च्या प्रदर्शनाला स्थगिती, नेमकं कारण काय?

Chetan Bodke

अन्नू कपूर मुख्य भूमिकेत असलेले 'हमारे बारह'च्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. पण सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. या चित्रपटामध्ये लोकसंख्या वाढीच्या विषयी ठळक वर्णन केलं असल्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका विशिष्ट समाजाला दोष या चित्रपटातून देण्यात आलेला आहे. जातीय तेढ टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

गुरुवारी (13 जून) अर्थात आज चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांबाबत मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करत नाही आणि निकाल देत नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. "उच्च न्यायालयासमोरील याचिका निकाली निघेपर्यंत, चित्रपट प्रदर्शित करणे चुकीचे असेल," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने अन्नू कपूर स्टारर चित्रपटाचा रिव्ह्यू करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. यामध्ये एक मुस्लिम समाजातीलही व्यक्ती होता. न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवली होती आणि निर्मात्यांना सोशल मीडियावरून ट्रेलर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

चित्रपटाचे प्रदर्शन १४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, जोपर्यंत चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांबाबत मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करत नाही आणि निकाल देत नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, अन्नू कपूर, पार्थ समथान, आश्विनी कळसेकर, मनोज जोशी, पारितोष त्रिपाठी, राहूल बग्गा सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sage Soyare Ordinance: मोठी बातमी! राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, चंद्रकात पाटील यांची माहिती

Mahadev Jankar Video: महादेव जानकरांची मोठी घोषणा; पुढची लोकसभा बारामतीतून लढणार!

Vitthal Maharaj Shastri Prediction : देवेंद्र फडणवीस होणार पुन्हा मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांची मोठी भविष्याणी

Raju Shinde Video: भाजपला मोठा धक्का; भाजप नगरसेवक राजू शिंदेंचा राजीनामा!

Rupali Bhosle: 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण झालं

SCROLL FOR NEXT