Gurucharan Singh Missing Case Update Instagram
मनोरंजन बातम्या

Gurucharan Singh : गुरूचरण सिंह बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी कुठे होता? वडिलांनी सांगितली सर्व घटना

Gurucharan Singh Missing Case Update : गुरूचरण बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी घरी काय झालं होतं याचा खुलासा वडीलांनी केलेला आहे.

Chetan Bodke

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता होऊन १० दिवसांहून अधिक कालावधी झाला आहे. पण अद्याप अभिनेत्याबद्दल काहीही कळू शकलेले नाही. गुरुचरणच्या आई-वडीलांसह त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सध्या अभिनेत्याबद्दल खूपच चिंतेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी अनेक वेगवेगळी माहिती समोर येत आहे. गुरूचरण बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी घरी काय झालं होतं याचा खुलासा वडीलांनी केलेला आहे.

नुकतंच गुरूचरणच्या वडीलांनी टाईम्स ऑफ इंडिया वेबसाईटसोबत संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले की, "जी घटना घडली आहे, ती खूप धक्कादायक आहे. आम्हाला कळत नाहीये, स्वत:ला कसं सांभाळू. आम्ही सर्व चिंतेत आहे. पोलिसांकडून आमच्या मुलाबद्दल काही माहिती मिळतेय का ?, याची वाट पाहतोय. मी आणि आमचे कुटुंबीय गुरूचरणच्या परत येण्याची वाट पाहतोय." (Television Actor)

बेपत्ता होण्यापूर्वी एक दिवसापूर्वी गुरूचरणने आपल्या वडीलांसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट शेअर केली आहे. त्या दिवशी गुरूचरणच्या वडीलांचा वाढदिवस होता. तर त्याने त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. गुरूचरणचे वडील हरगीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या वाढदिवशी कोणतंही सेलिब्रेशन आम्ही केलं नाही. आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र असल्यामुळे मला खूप छान वाटलं. त्याला दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं होतं." (Bollywood News)

गुरुचरणला त्याची मैत्रीण भक्ती सोनी मुंबई विमानतळावर घ्यायला जाणार होती. पण गुरुचरण विमानतळावर पोहोचलाच नाही. भक्ती सोनीही बराच वेळ वाट पाहुन घरी गेली. त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. लवकरच पोलिस त्याचा शोध घेतील, याची शाश्वती अशी प्रतिक्रिया भक्तीने दिली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT