Shruti Vilas Kadam
शॅम्पू लावण्यापूर्वी केस पूर्णपणे पाण्याने भिजवा. यामुळे शॅम्पू समान रीतीने पसरतो आणि कमी प्रमाणातही चांगला फेस येतो.
केसांच्या लांबीप्रमाणे शॅम्पू घ्या. शॅम्पू थेट टोकांवर न लावता, आधी टाळूवर (स्काल्प) हलक्या हाताने मसाज करा.
नखांनी नाही तर बोटांच्या टोकांनी गोलाकार मसाज करा. यामुळे मळ, तेल निघून जातं आणि रक्तसंचार वाढतो.
शॅम्पू केसांमध्ये राहू देऊ नका. नीट न धुतल्यास कोंडा, कोरडेपणा आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते.
कंडिशनर कधीही टाळूवर लावू नका. तो फक्त मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावा आणि 2–3 मिनिटे ठेवा.
शॅम्पूनंतर आणि कंडिशनरच्या आधी किंवा ऐवजी हेअर मास्क लावा. 10–15 मिनिटे ठेऊन मग कोमट पाण्याने धुवा.
केस ओले असताना नाजूक असतात. टॉवेलने हलकेच पाणी शोषून घ्या आणि शक्यतो नैसर्गिकरित्या केस वाळू द्या.