Gudi Padwa Special SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gudi Padwa Special : गुढीपाडवा स्पेशल! तुमच्या आवडत्या मालिकांचे विशेष भाग, सानिका अन् इंद्रायणी एकत्र येणार

Indrayani And Lai Avadtes Tu Mala : गुढीपाडवा स्पेशल 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' या मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या महासंगममध्ये अनेक ट्विस्ट येणार आहेत.

Shreya Maskar

सध्या मालिकांमध्ये गुढीपाडवा विशेष एपिसोड पाहायला मिळत आहे. 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' या मालिकांना चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही कार्यक्रमात सध्या खूप काही घडत आहे. या दोन मालिकांचे देखील गुढीपाडवा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' या मालिकांचे महासंगम गुढीपाडवा विशेष भाग येत्या ३० तारखेला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

'इंद्रायणी' (Indrayani ) आणि 'लय आवडतेस तू मला' ( Lai Avadtes Tu Mala ) गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) विशेष भाग अधिक मनोरंजक ठरणार आहेत. अनेक उत्कंठावर्धक ट्विस्ट आणि कथेतील नवे वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. गुढीपाडव्याच्या मंगलदिनी सानिका आणि सरकार आपल्या नवीन आयुष्याच्या प्रारंभासाठी शुभेच्छा मागत असतानाच त्यांच्या सुखद संसारावर संकटाचे सावट गडद होत जाणार आहे. त्यांच्या लग्नाला सानिकाच्या आई-वडिलांचा आशीर्वाद मिळावा अशी सानिकाची इच्छा आहे.

सानिकाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी इंद्रायणीची साथ सरकार - सानिकाला मिळणार आहे. ज्यात ती सानिकाला वचन देऊन मोठ्या आत्मविश्वासाने सांगते की, "सानिकाला आई-वडिलांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल." आता इंद्रायणी हे कसे घडवून आणणार ? सानिका - सरकारला तिच्या आई - वडिलांचा आशीर्वाद मिळेल? हे सर्व पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' या मालिका कलर्स मराठीवर पाहायला मिळतात.

'लय आवडतेस तू मला' मालिकेत जेलमध्ये साहेबरावांच्या हातात सानिका आणि सरकारचा जळणारा फोटो दिसतो. लग्नमंडपात सानिका आणि सरकार आनंदाने विवाहबद्ध होत असताना जय आणि त्याचे गुंड हातात तलवारी घेवून हल्ला करण्यास येतात. हा महासंगम विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरणार आहे. 'इंद्रायणी'च्या कीर्तनाच्या प्रभावामुळे साहेबरावांच्या मनात परिवर्तन होईल का? जय आणि त्याच्या गुंडांचा कट यशस्वी होईल की प्रेमाच्या बळावर सानिका आणि सरकार यशस्वी होतील? हे सर्व गुढीपाडवा विशेष एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT