Ram Charan : तोंडात जळती सिगारेट अन् डोळ्यामध्ये आग; राम चरणनं दिलं बर्थडेला चाहत्यांना मोठ गिफ्ट

RC16 Is Titled Peddi: आज साऊथ सुपरस्टार राम चरणचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने RC16 चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. तसेच चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे.
RC16 Is Titled Peddi
Ram CharanSAAM TV
Published On

साऊथचा सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज (27 मार्च) अभिनेता राम चरणचा वाढदिवस आहे. आता राम चरण आज 40 वर्षांचा झाला आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसानिमित्त राम चरणने चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. त्याने इन्स्टाग्राम एक खास पोस्ट केली आहे.

राम चरणने त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून सिनेमाचे नाव देखील जाहीर केले आहे. 'RC16'चित्रपटाचे नवीन नाव 'Peddi' असे ठेवले आहे. तसेच चित्रपटाचा पहिला लूक देखील समोर आला आहे. यात राम चरण एका खास अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या या लूकनं लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

पोस्टरमध्ये राम चरणचे थरारक रूप पाहायला मिळत आहे. तोंडात जळती सिगारेट, डोळ्यामध्ये आग, लांब केस आणि वाढलेली दाढीमध्ये राम चरण दिसत आहे. तर 'Peddi' च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये राम चरणने लाल आणि निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्याच्या हातात एक शस्त्रही दिसत आहे. राम चरणचा हा लूक खूपच खास आहे. 'Peddi' चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राम चरणने या पोस्टला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "A FIGHT FOR IDENTITY" त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकरांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. राम चरण त्याच्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहतो. अलिकडेच तो 'गेम चेंजर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटाला आला होता. राम चरणने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्याचा 'आरआरआर' हा चित्रपट खूप गाजला.

RC16 Is Titled Peddi
Salman Khan : मराठमोळी अभिनेत्री झळकली सलमान खानसोबत; 'त्या' जाहिरातीनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com