Salman Khan : मराठमोळी अभिनेत्री झळकली सलमान खानसोबत; 'त्या' जाहिरातीनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Anushka Sarkate Advertisement With Salman Khan : मराठमोळी अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत एक जाहिरात केली आहे. सध्या ही जाहिरात चांगचील चर्चेत आहे.
Anushka Sarkate Advertisement With Salman Khan
Salman KhanSAAM TV
Published On

एखाद्या मोठ्या अभिनेत्याला भेटणं, त्याला पाहणं ही प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. सर्व सामान्यांप्रमाणे बरीच कलाकार मंडळी सुद्धा आहेत जे अभिनेत्यांसाठी वेडी असतात. एकदा तरी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करता यावी ही एकच इच्छा मनाशी बाळगून ही कलाकार मंडळी सिनेसृष्टीत वावरत असतात.

सलमान खान (Salman Khan) , शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या नावाजलेल्या कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळणे म्हणजेच सोने पे सुहागा असतो. मराठी कला विश्वातील अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी या दिग्गज कलाकारांसह स्क्रीनही शेअर केली आहे. दिग्गज कलाकारासह काम करण्याचा अनुभव मिळणे ही अर्थातच अभिमानाची बाब आहे. असेच एक स्वप्न उराशी बाळगून मराठवाड्यातील मुलगी थेट मुंबईत आली.

एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नावाजलेल्या कलाकारासह काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ही अभिनेत्री म्हणजेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) होय. तिला बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अनुष्काने तिचा अभिनयाचा प्रवास शिक्षण घेत असतानाच सुरू केला. 'श्री लक्ष्मीनारायण' ही तिची पहिलीच मालिका. यानंतर अनुष्काने कधी मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर अनुष्काने 'कारभारी लयभारी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली. यापाठोपाठ '३६ गुणी जोडी' ही तिची मालिकाही विशेष चर्चेत राहिली. मालिका विश्वात सक्रिय असणाऱ्या अनुष्काने जाहिरातीमधूनही प्रेक्षकांची मन जिंकली.

मालिका व्यतिरिक्त अनुष्काने जाहिरातीमधून तिचे नाव कमावले. पीएनजी ज्वेलर्स, पार्ले क्रॅकजॅक , कीर्ती गोल्ड ऑइल, बिग बास्केट अशा अनेक नामवंत ब्रँडसाठी अनुष्का मुख्य चेहरा बनली. यानंतर आता अनुष्का बॅालिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत जाहिरातीत झळकली. अनुष्काचा सलमानसह काम करण्याचा योग आला. त्यांनी 10x classic atta या ब्रँडच्या जाहिरातीसाठी एकत्र काम करताना दिसले. सलमानबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं हे अनुष्काचं स्वप्न होत आणि ते अखेर पूर्ण झाले.

आयुष्यातील हा सुरेख अनुभव शेअर करत अनुष्का म्हणाली, "ज्याचे चित्रपट बघून मी लहानाची मोठी झालीये, जो आपल्या युगातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे अशा सलमानखान सोबत काम करणं स्वप्नवत तर नक्की होतंच पण त्याच बरोबर खुप प्रेरणादायी ही होते. मी खुप आनंदी आणि कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली."

Anushka Sarkate Advertisement With Salman Khan
Usha Nadkarni Elimination : उषा नाडकर्णी यांची 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधून एक्झिट, 'या' दोन चुका पडल्या महागात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com