Usha Nadkarni Elimination : उषा नाडकर्णी यांची 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधून एक्झिट, 'या' दोन चुका पडल्या महागात

Celebrity MasterChef : उषा नाडकर्णी यांची 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधून एक्झिट झाली आहे. शेवटच्या टप्प्यावर येऊन त्यांचा प्रवास थांबला आहे. नेमकं टास्कमध्ये काय घडलं, जाणून घेऊयात.
Celebrity MasterChef
Usha Nadkarni EliminationSAAM TV
Published On

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (*Celebrity MasterChef) कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यावर आला आहे. अनेक टास्क करून सेलिब्रिटी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचले आहेत. यात अनेक सेलिब्रिटींना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा प्रवास सोडावा लागला आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये सेलिब्रिटींनी चमचमीत पदार्थांची मेजवानी परीक्षकांना खाऊ घातली. नुकतेच या शोमधून एका सेलिब्रिटीची एक्झिट झाली आहे. या एलिमेनेशनमुळे चाहते नाराज आहेत.

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांचा 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा प्रवास अखेर थांबला आहे. त्यांची 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमधून एक्झिट झाली आहे.आयेशा झुलकानंतर उषा नाडकर्णी यांने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधून एविक्शन झाले आहे. नुकताच झालेल्या टास्कमध्ये उषा नाडकर्णी यांनी बाजी मारली नाही. हा टास्क तेजस्वी प्रकाश, राजीव अडातिया, गौरव खन्ना, उषा नाडकर्णी आणि अर्चना गौतम या पाच सेलिब्रिटींनमध्ये झाला.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या टास्कमध्ये सेलिब्रिटींना मिस्ट्री बॉक्स निवडून एक पदार्थ बनवायचा होता. तेव्हा उषा नाडकर्णी यांनी रणवीर बरार यांच्या समोरील मिस्ट्री बॉक्स निवडला. या बॉक्समध्ये माशाच्या पदार्थ बनवायचा होता. मात्र यापूर्वी उषा ताईंकडून चिकन कच्चे राहिले होते. त्यामुळे फराह खान त्यांना सतत सावध करत होत्या मात्र अखेर घाईगडबडीत माशाची थाळी सजवताना उषा ताईंनी माशाची शेपूट कापून टाकली. जी थाळीला खास दाखवणार होती.

माशाची शेपूट कापण्यासोबतच उषा नाडकर्णी यांनी अजून एक चूक केली. ती म्हणजे, परीक्षकांनी जेव्हा पदार्थ खाल्ला, तेव्हा त्यांना समजले की, यावेळी मासा जास्त शिजला गेला आहे. या दोन चुकांमुळे उषा नाडकर्णी यांची सेमी फिनालेमध्ये जाण्याची संधी हुकली. मात्र त्यांच्या चटणीचे परीक्षकांनी खूप कौतुक केले. आतापर्यंत फक्त फैजूला पांढरा अ‍ॅप्रन मिळाला आहे. ज्यामुळे त्याची थेट फिनालेमध्ये एन्ट्री झाली आहे. आता 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता कोण होणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Celebrity MasterChef
Manoj Bharathiraja Death : सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com