Manoj Bharathiraja Death : सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शोककळा

Manoj Bharathiraja : अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Manoj Bharathiraja
Manoj Bharathiraja Death SAAM TV
Published On

कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तमिळ चित्रपट दिग्दर्शक भारतीराजा यांचा मुलगा अभिनेता मनोज भारतीराजा (Manoj Bharathiraja) यांचे दुःखद निधन झाले आहे. यांनी मंगळवारी ( 25 मार्च) ला अखेरचा श्वास घेतला. चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, मनोज भारतीराजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मनोज यांची काही दिवसापूर्वी बायपास सर्जरी झाल्याची बातमी समोर आली होती. शेवटी त्यांनी वयाच्या 48 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोज भारतीराजा यांच्या कुटुंबात पत्नी अश्वथी उर्फ नंदना आणि दोन मुली आहेत. ज्यांची नावे अर्शिता आणि मथिवथानी आहेत. मनोज भारतीराजा यांनी आजवर अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. चाहते त्यांच्या अभिनयाचे दिवाने आहेत.

मनोज भारतीराजा यांनी 'ताजमहल' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या वडिलांनी म्हणजे भारतीराजा यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मनोज भारतीराजा अलिकडेच 'स्नेक्स अँड लॅडर्स' या सीरिजमध्ये पाहायला मिळाले. मनोज भारतीराजा यांनी अभिनयासोबतच चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

मनोज यांनी 'ताजमहल' चित्रपटातील ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं 'इची एलुमिची' हे गाणे गायले आहे. त्यांची कारकीर्द खूप मोठी आणि उल्लेखनीय आहे. मनोज भारतीराजा यांच्या अचानक निधनानंतर सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. तसेच नेत्यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

Manoj Bharathiraja
Chhorii 2 Teaser : "वो खेत, वो खतरा, वो खौफ…", 'छोरी 2' चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीझर पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com