Chhorii 2 Teaser : "वो खेत, वो खतरा, वो खौफ…", 'छोरी 2' चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीझर पाहिलात का?

Chhorii 2 : 'छोरी 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नेमकं चित्रपटात काय, जाणून घेऊयात.
Chhorii 2
Chhorii 2 TeaserSAAM TV
Published On

2025मध्ये मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. अनेक चित्रपट, सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहींचे ट्रेलर लाँच झाले आहेत तर काही चित्रपटांची रिलीज डेट समोर येत आहे. अशात आता अजून एका चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. नुकताच 'छोरी 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून नक्कीच अंगावर काटा येईल. 'छोरी 2'चा (Chhorii 2 ) टीझर पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

'छोरी 2' चित्रपटाचा टीझर (Chhorii 2 Teaser ) मंगळवारी (25 मार्च) ला रिलीज करण्यात आला. हा एक भयपट आहे. या टीझरला देखील खतरनाक कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "एक बार फिर…वो खेत, वो खतरा, वो खौफ…" या कॅप्शनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'छोरी 2' पहिल्या भागापेक्षा जास्त भयानक आणि भीतीदायक असणार आहे. 'छोरी 2' मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) पुन्हा पाहायला मिळणार आहे. तिचा संघर्ष चित्रपटात पाहायला मिळेल. तसेच चित्रपटात सोहा अली खान (Soha Ali Khan) एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमधील तिचा लूक खूप भयानक आहे.

छोरी चित्रपट

'छोरी' हा चित्रपट 2021मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच आपल्याला पाहता येणार आहे. 'छोरी' हा मराठी चित्रपट 'लपाछपी'रिमेक होता. आता चार वर्षांनी 'छोरी 2' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'छोरी 2'11 एप्रिल 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटाचा प्रीमियर प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

'छोरी 2'च्या दिग्दर्शनाची धुरा विशाल फुरिया यांनी सांभाळली आहे. खूप वेळानंतर सोहा अली खान चित्रपटात दिसणार आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिच्या या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते आतुर आहेत.

Chhorii 2
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात मोठा बदल, कलाकारांनी रॅप साँगमधून केला खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com