'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या शोने जगाला वेड लावले आहे. तसेच या कार्यक्रमातील कलाकारांना देखील लोकप्रियता मिळाली आहे. कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचले आहेत. या शोचे सूत्रसंचालन मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. प्राजक्ता माळीने आपल्या अनोख्या शैलीने कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाने अनेकदा विदेश दौरे देखील केले आहे. नुकतीच या कार्यक्रमाची मोठी अपडेट समोर आली आहे. 'सोनी मराठी' वाहिनीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शोच्या संबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात कार्यक्रमात झालेल्या बदलाचा उल्लेख केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्यक्रमातील कलाकारांनी एक भन्नाट रॅप गाणं गाऊन याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम रात्री साडेनऊ वाजता पाहायला मिळतो. मात्र आता या वेळेमध्ये बद्दल करण्यात आला आहे. सर्वांचा आवडता शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' रात्री साडेनऊ ऐवजी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. हा महत्त्वाचा बदल येत्या 31 मार्चपासून करण्यात येणार आहे. आता अर्धा तास आधी कॉमेडीची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
"आयुष्यात मॅटर आहेत सतरा, काही टेन्शन नाही मित्रा, सगळ्यावरची एकच मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा…!" अशा ओळींचे जबरदस्त रॅप व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या या नव्या रॅपमध्ये शोचे कलाकार पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये शोचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर तर प्राजक्ता माळी देखील या रॅपमध्ये पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये कलाकारांचा रॅप लूक पाहायला मिळत आहे. समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, नम्रता संभेराव, अरुण कदमसह अनेक कलाकार झळकले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.