
मुघल बादशाह औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद निर्माण झालाय. या वादावरून नागपुरात दंगल उसळली. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. आता कबरीच्या वादामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उडी घेतलीय. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
कबर हटवण्यावरून सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलीय. पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकावर गंभीर आरोप केलेत. सरकारलाच औरंगजेबाची कबर हटवायची नाहीये. कबर हटवायची असती तर त्यांनी कबरीला पोलिसांचं संरक्षण दिले नसते, असा आरोप जरांगेंनी केलाय. माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय.
टीव्ही नाइनने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबची कबर काढायचीच नाहीये. त्यांनीच कबर फोकसला आणली. ते डबडं कुठं पुरून ठेवलंय हे कुणालाच माहिती नव्हतं. आता त्याची माहिती करून देत औरंगजेबला फोकसमध्ये आणलंय. फडणवीसांना कबर काढायची नाहीये. काढायची असती तर त्यांनी पोलीस संरक्षण दिलं नसतं. त्यांना फायद्यासाठी लढायचं आहे, असं जरांगे पाटील म्हणालेत.
फडणवीसांना मराठ्यांची नस कळलीय. मारामाऱ्या करण्यासाठी त्यांनी मराठ्यांना ठेवलंय. त्यांनी आमचा खूप वापर केला. आमच्या लेकरांनी मारामाऱ्या करायच्या आणि मलिदा यांनी खायचा असं सुरू आहे. त्यामुळे मराठ्यांचं वाटोळं झालंय. यांनी ७० ते ७५ वर्ष यांनी मराठ्यांचा भांडणासाठी वापर केला. ते फक्त विषय उकरून काढतात आणि भांडणं लावून मोकळे होतात. या राजकारणामुळे आमच्या समाजाची लेकरं खाक झालीत. आम्हाला शिक्षण दिलं नाही, ना नोकरी दिली. आम्हाला खाक केलं, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
फडणवीस तुम्ही स्वत:चला, मीही येतो. कट्टर आहात ना? या कशी कबर निघत नाही बघू? त्यांनाच काढायची नाहीये. सरकारनेच या कबरीच्या दिवा बत्ती, हारफुलांसाठी पैसे दिलेत. दोन लाख ६० हजार रुपये बिल सरकारनेच भरले, असा दावाही जरांगेंनी केलाय. अंतरवलीतील छत्रपती भवनात मराठा समाजाची आज बैठक झाली. राज्यातील २० तालुक्यातून लोक आली होती. सर्व गावाच्यावतीने आम्ही निमंत्रण दिलंय. समाजाच्या अनेक अडचणी आहेत. रुग्णालय, जमिनी आणि इतर अनेक अडचणी आहेत.त्या समस्या समजून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचं जरांगे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.