Game Changer OTT Release: राम चरण आणि कियारा अडवाणीचा 'गेम चेंजर' घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार; कुठे अन् कधी जाणून घ्या…

Game Changer OTT Release: राम चरण आणि कियारा अडवाणीचा 'गेम चेंजर' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. पण, लवकरच 'गेम चेंजर' ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.
Game changer
Game changerGoogle
Published On

Game Changer OTT Release: राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या धुमधडाक्यात प्रदर्शित झाला, पण प्रेक्षकांनी त्याला म्हणावा तास प्रतिसाद दिला नाही. १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला १२ दिवसांत देशात फक्त १४७ कोटी रुपये कमाई करता आली आहे. पण, राम चरणच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. आता अशी चर्चा आहे की थिएटरमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी निर्माते लवकरच ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांचा मोठा व्यवहार करण्यात आला आहे.

शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर'च्या ओटीटी रिलीजबाबत 'ओटीटी प्ले'ने ही बातमी दिली आहे. या वृत्तात चित्रपटाच्या निर्मात्यांच्या जवळच्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी अमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत एक मोठा करार केला आहे. आणि या करारानुसार 'गेम चेंजर' पुढील महिन्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Game changer
Kaun Banega Crorepati: केबीसीचा रौप्य महोत्सव; २५ वर्षांनंतर शोचा पहिला करोडपती पुन्हा बसला हॉट सीटवर!

'गेम चेंजर' ओटीटीवर कधी प्रदर्शित होईल?

या अहवालात असे म्हटले आहे की 'गेम चेंजर' १४ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होऊ शकतो. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हा चित्रपट राम चरण आणि कियाराच्या चाहत्यांसाठी एक भेट असेल. परंतु, चित्रपटाचे हिंदी डब केलेले व्हर्जन सध्या ओटीटीवर प्रदर्शित होणार नसल्याचे समजते.

Game changer
Mission Ayodhya: रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल; 'मिशन अयोध्या' चित्रपट लवकरच प्रदर्शित!

निर्माते लवकरच औपचारिक घोषणा करतील

दरम्यान, ओटीटी रिलीजबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु असे समजते की एकदा करार आणि रिलीज तारीख निश्चित झाली की, अधिकृत घोषणा करण्यात येईल. 'गेम चेंजर' हा चित्रपट ५०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत आहे, तर कियारा अडवाणी यात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एसजे सूर्या, श्रीकांत आणि जयराम यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com