Ground Zero Box Office Collection SAAMTV
मनोरंजन बातम्या

Ground Zero Box Office Collection : इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटाची पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी, फक्त कमावले 'इतके' कोटी

Ground Zero Box Office Day 1: बॉलिवूडचा सुपरस्टार इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'ग्राउंड झिरो'मध्ये (Ground Zero ) इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi ) मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) देखील झळकली आहे. ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचे ओपनिंग डेचे कलेक्शन समोर आले आहे. 'ग्राउंड झिरो' चित्रपट पहिल्या दिवशी प्रेक्षकांवर जादू करण्यास अयशस्वी ठरला आहे. चित्रपटाने खूपच कमी आकड्यात कमाई केली आहे.

'ग्राउंड झिरो' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये दहशतवादी गाझी बाबा कसा मारला गेला हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील इमरान हाश्मीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. 'ग्राउंड झिरो' चित्रपट काल (25 एप्रिल) ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनच आकडे समोर आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, इमरान हाश्मीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' चित्रपटाची सनी देओलच्या 'जाट' आणि अक्षय कुमारच्या 'केसरी 2'सिनेमाशी टक्कर चालू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या 'केसरी 2' ने जगभरात 70.7 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर भारतातील बॉक्स ऑफिसवर 50.7 कोटींची कमाई केली आहे. तर सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने जगभरात 107 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात चित्रपटाने 93.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'ग्राउंड झिरो' चित्रपटात इमरान हाश्मी, सई ताम्हणकरसोबत ललित प्रभाकर, मुकेश तिवारी, दीपक परमेश, रॉकी रैना, झोया हुसैन हे कलाकार देखील झळकले आहेत. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता वीकेंडला 'ग्राउंड झिरो' किती कोटींची कमाई करणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT