Shatrughan Sinha: 'हिंदू-हिंदू काय लावलंय?; पहलगाम हल्ल्यावरील शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवात
Shatrughan Sinha On Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान विचारले, "हिंदू-हिंदू काय लावलंय? का सांगताय हिंदू?" त्यांच्या या प्रश्नामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
शत्रुघ्न काय म्हणाले?
खरंतर, जेव्हा शत्रुघ्न यांना या हल्ल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले, 'काय झाले आहे?' जेव्हा रिपोर्टरने सांगितले की जे काही घडले ते हिंदूंसोबत घडले, तेव्हा ते म्हणाले, हे हिंदू-हिंदू काय लावलंय? तिथे हिंदू, मुस्लिम, सगळेच भारतीय होते. यानंतर शत्रुघ्न म्हणाले की, हे प्रचार युद्ध खूप दिवसांपासून सुरू आहे. मला वाटतं हा एक संवेदनशील मुद्दा आहे. याचा खोलवर विचार करायला हवा. आपण असे काहीही बोलू किंवा करू नये ज्यामुळे तणाव वाढेल. आता जखम बरी व्हायला हवी. शत्रुघ्न यांच्या या टिप्पणीवर अनेक लोक नाराज आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या या विधानावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना 'हिंदूविरोधी' ठरवले आहे, तर काहींनी त्यांच्या वक्तव्याला 'अविचारी' म्हटले आहे. सोशल मीडियावर #ShatrughanSinha ट्रेंड करत असून, अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता आणि 10 हून अधिक जखमी झाले होते. हल्लेखोरांनी पीडितांच्या धर्माची विचारणा करून त्यांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वीही पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, "जोश में कहीं अपना होश न खो बैठें." त्यांच्या या विधानावरही त्यावेळी विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.