Dhanashree varma: युजवेंद्र चहलसोबत डिव्होर्सनंतर धनश्री वर्माचा नवा प्रवास सुरु; 'या' चित्रपटातून करणार डेब्यू

Dhanashree varma Acting debut: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सोबत डिव्होर्सनंतर धनश्रीने एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ती लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून, तिचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dhanashree Verma
Dhanashree VermaSaam Tv
Published On

Dhanashree varma Acting debut: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा यांचं वैयक्तिक आयुष्य अलीकडेच चर्चेत आलं होतं. दोघांनी आपापल्या सोशल मीडिया पोस्टमधून घटस्फोटाची माहिती दिल्यानंतर त्यांच्या वेगळ्या झालेल्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता धनश्रीने एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. ती लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून, तिचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिपोर्टनुसार, धनश्री वर्मा 'आकसम दाती वस्तावा' या तेलुगु चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात करणार आहे. हा एक नृत्यावर आधारित चित्रपट असेल जो दिल राजू निर्मित करत आहे. दिल राजूने याआधी 'संक्रांतिकी वास्तुनम', 'वारीसू' आणि 'हिट: द फर्स्ट केस' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटात धनश्री तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसेल.

Dhanashree Verma
Sara Ali Khan: एकीकडे श्रद्धांजली, तर दुसऱ्या बाजूला काश्मीर ट्रिपचे फोटो; सारा अली खानच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात

द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाच्या वृत्तानुसार, हा चित्रपट श्री शशी कुमार दिग्दर्शित करत आहेत. येत्या आठवड्यात चित्रपटातील संपूर्ण कलाकारांची नावे जाहीर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, अलीकडेच धनश्रीने चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आणि शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. तिने फोटोंना कॅप्शन दित लिहीले, "आणि हा माझ्या पहिल्या चित्रपटाचा शेवटचा दिवस आहे. तुमचा पहिला चित्रपट पूर्ण करण्याचा अनुभव वेगळा आहे. खूप उत्साहित आणि नर्व्हस. माझ्या सुपर टीम आणि दिल राजू प्रॉडक्शनसोबत खूप छान वेळ घालवला. थिएटरमध्ये भेटू. देवाची योजना." या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या पहिल्या तेलुगू चित्रपटाबद्दल माहिती दिली होती.

Dhanashree Verma
Hina Khan: मी एक मुस्लिम आहे पण...; काश्मिरी हिना खानची पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर माफी मागणारी पोस्ट

धनश्रीचं चहलपासून विभक्त होणं हे तिच्या आयुष्यातील एक कठीण वळण होतं, पण तिने त्यावर मात करत स्वतःच्या कलात्मक क्षमतेकडे लक्ष दिलं आहे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता ती प्रेक्षकांसमोर एक अभिनेत्री म्हणून काय कमाल करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com