Govinda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Govinda: 'लोकांना काय प्रोब्लेम आहे कळत नाही...'; कोमल राणीसोबतच्या नात्यावर गोविंदा स्पष्ट बोलला

Govinda: गोविंदा कोमल राणी स्वर्णकारसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यानंतर चर्चांना उधाण आलं. या भेटीवर अभिनेत्याने स्पष्टीकरण देत ‘रूपा’ चित्रपटासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्याचं सांगितलं.

Shruti Vilas Kadam

Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या आगामी चित्रपटासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी गोविंदा रुमर्ड गर्लफ्रेंड कोमल राणी स्वर्णकारसोबत गेला होता. यावेळीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं. आता या प्रकरणावर गोविंदाने प्रतिक्रिया देत आपण कोमलसोबत गणपतीच्या दर्शनाला का गेलो होतो, याचं कारण स्पष्ट केलं आहे.

‘रूपा’ चित्रपटासाठी घेतलं बाप्पाचं आशीर्वाद

एका मुलाखतीत गोविंदाने लालबागच्या राजाच्या दर्शनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिलं. आपण आगामी ‘रूपा’ या चित्रपटासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, असं त्याने सांगितलं. या चित्रपटात कोमल राणी त्याच्यासोबत काम करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. गोविंदाने यावेळी सहकलाकारासोबत धार्मिक स्थळी जाणं त्याच्यासाठी नवीन नसल्याचं सांगितलं. यापूर्वीही तो अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत चित्रपटांसाठी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्याचं त्याने नमूद केलं.

गोविंदा म्हणाला, करिश्मासोबत बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर त्याचा चित्रपट यशस्वी ठरला होता. त्यानंतर रवीनासोबतही त्याने दर्शन घेतलं आणि तो चित्रपटही हिट झाला. त्यामुळे यावेळी ‘रूपा’ चित्रपटासाठी कोमल राणीसोबत बाप्पाचं दर्शनाला मी गेलो होतो. यामुळे होणाऱ्या चर्चेबाबत गोविंदाने नाराजी व्यक्त केली. सहकलाकारासोबत धार्मिक स्थळी गेल्यावर लोक एवढी चर्चा का करत आहेत, हे मला कळत नाही की लोकांना काय प्रोब्लेम आहे. हा चित्रपट आताशी सुरु झाला आहे आणि लोक आतापासूनच एवढी चर्चा करत आहेत. मला कळत नाही लोकांना नक्की काय प्रोब्लेम आहे. पण यामुळे मला प्रसिद्ध मिळते तर करत राहावं तुम्ही चर्चा.

दरम्यान, गोविंदा आणि कोमल राणी यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. दोघांमध्ये कथित अफेअर असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र, गोविंदाने या अफवांवर थेट भाष्य केलेलं नाही. त्याने केवळ कोमल ही त्याच्या आगामी चित्रपटाची सहकलाकार असल्याचं सांगितलं आहे.

Maharashtra News Live Update: पुण्याचा पाचवा मानाचा गणपती, केसरी वाड्यातील गणपतीचं 6 वाजता विसर्जन

घरात आढळणारी पाल खरंच विषारी असते का? चावा घेतल्यास काय करावं?

Nalasopara Beach : काळसर वाळू अन् मनमोहक सूर्यास्ताचा अनुभव; मुंबईजवळचा ‘हा’ बीच आहे खास

Gangajal Vastu Tips: घरामध्ये गंगाजल ठेवताना 5 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

PM मोदींचा महिलेसोबतचा फोटो केला शेअर; उच्च न्यायालयाची अभिजीत दीपकेंसह CJPच्या कार्यकर्त्यांना नोटीस

SCROLL FOR NEXT